शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अपंग व्यक्तीची सेवा ही खरी ईश्वरसेवा

By admin | Updated: November 15, 2014 01:50 IST

शरीराने अपंग असलेल्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरण्याचा पूर्ण अधिकार आहे. अपंग व्यक्तीला समाजाने सहकार्याच्या व मदतीच्या भावनेने बघितले पाहिजे.

गोंदिया : शरीराने अपंग असलेल्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरण्याचा पूर्ण अधिकार आहे. अपंग व्यक्तीला समाजाने सहकार्याच्या व मदतीच्या भावनेने बघितले पाहिजे. अपंग व्यक्तीची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य प्रशासन, जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद व संकल्प बहुउद्देशिय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित अपंग व्यक्तीच्या नुकत्याच आयोजित अतिविशेषोपचार शस्त्रक्रिया शिबिरात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. शिबिराला मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे, उपवनसंरक्षक डॉ. रामगावकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आ. गोपालदास अग्रवाल यांंनीही शिबिराला भेट दिली.पुढे बोलताना डॉ. अमित सैनी यांनी सांगितले की, अपंगत्व हा आजार नाही. अपंगत्वामुळे अपंग व्यक्तीकडे समाजातील लोकांनी हीनभावना ठेवू नये. म्हणजे त्याला अपंगत्वाची जाणीव होणार नाही. शिबिरामध्ये भूलतज्ञ डॉ. अझहर खान, डॉ. अनुश्री बाहेकर, डॉ. सुगंध, अस्थीरोगतज्ञ डॉ. मनोज राऊत, डॉ. लोकेश खतवार, डॉ. भार्गव गुल्हाने यांनी सहकार्य केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. किमतकर व त्यांच्या चमूने १२ अपंग शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या. अपंग व्यक्तीची शस्त्रक्रिया शिबिर साहित्याकरिता मोजमाप करुन डॉ. सजल मित्रा व अस्थिरोग विभागप्रमुख यांनी ९ अपंग व्यक्तीची निवड केली. शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर, प्रस्तावित मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, डॉ. सजल मिश्रा, डॉ. सतिश जायस्वाल, डॉ. अशोक चौरसिया, डॉ. विनोद वाघमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राज वाघमारे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल परियाल, डॉ. जी.एल. दुधे उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. पंकज पटले, डॉ. स्रेहा वंजारी, सांख्यिकी सहायक निशांत बन्सोड, अनिरुद्ध शर्मा, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक अजितसिंग, पवन वासनिक, विजय ठोकणे, अनू नांदणे, रंजिता सयाम, फुलझेले, धुर्वे, निर्मला चौधरी, इंदिरा पटले, आसमा नागरगोजे, भावना सोलंकी, श्रीमती जिवणे, श्रीमती कोटावार, पारधी, येल्ले, फड, शैलेष टेंभरे, जितेंद्र पारधी, सचिन लोखंडे, रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)