दुसरी पत्नीही पोटगीस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 01:47 IST2016-02-04T01:47:16+5:302016-02-04T01:47:16+5:30

दुसरी पत्नी सुध्दा पोटगी मिळण्यास पात्र आहे. असा निर्वाळा देत अर्जुनी-मोरगाव न्यायालयाने येरंडी-देवी येथील ममीता दुधराम हत्तीमारे या महिलेला पोटगी मंजूर केली आहे.

The second wife also belongs to Potgius | दुसरी पत्नीही पोटगीस पात्र

दुसरी पत्नीही पोटगीस पात्र

मंजुरीचा आदेश : अर्जुनी न्यायालयाचा निर्णय
अर्जुनी-मोरगाव : दुसरी पत्नी सुध्दा पोटगी मिळण्यास पात्र आहे. असा निर्वाळा देत अर्जुनी-मोरगाव न्यायालयाने येरंडी-देवी येथील ममीता दुधराम हत्तीमारे या महिलेला पोटगी मंजूर केली आहे.
सडक-अर्जुनी तालुक्याच्या वडेगाव येथील दुधराम गोपाळा हत्तीमारे याने ममीताशी २३ मार्च २००३ रोजी येरंडी/देवी येथे विवाह झाला. ती घरी नांदण्यासाठी गेली तेव्हा त्याचे यापूर्वी पुष्पा नामक महिलेशी लग्न झाल्याचे कळले. यातून ममीताला १४जून २००४ रोजी अपत्य झाले. २६ एप्रिल २०१२ रोजी पहिली पत्नी व दुधरामने तिला बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. याची डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तेव्हापासून ममीता ही माहेरीच राहत आहे. २२ जानेवारी २०१३ रोजी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले.
ममीताचे विधिज्ञांनी न्यायालयात युक्तीवाद करतांना दूधरामने त्याचे पहिले लग्न लपवून ममीताशी दुसरे लग्न केले. ते तिला सासरी गेल्यानंतर कळले. तिला उपजीविकेकरिता काहीही दिले नाही. तिला उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत्र नाही. दुधरामची पुरेशी ऐपत असून तो पोटगी देण्यास समर्थ असल्याचे सांगितले.
दुधरामचे विधिज्ञांनी न्यायालयात युक्तीवाद करतांना ममीता ही कायदेशीर पत्नी नसल्याने तिला पोटगी मागण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू समजून घेतल्या. सविताबेन सोमाभाई भाटिया विरूध्द गुजरात सरकार व इतर एआयआर २००५ सर्वोच्च न्यायालय १८०९ या निर्णय विधीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केलेले अभिक्षण लक्षात घेतले. अर्जदाराचे विधिज्ञांनी बादशाह विरूध्द उर्मिला बादशहा गोडसे आणि इतर या निर्णय विधीचा आधार घेतला. यात पत्नीने त्याचा पहिला विवाह लपवून दुसरा विवाह केला असल्यास दुसरी पत्नी पोटगी मागण्यास पात्र असल्याचे म्हटले आहे.
उभयपक्ष शेतकरी कुटूंबातील आहे. सद्य परिस्थितीतील वाढती महागाई व आवश्यक मूलभूत गरजांचा विचार करता ममीतास ८०० रुपये दरमहा पोटगी अर्ज दाखल झालेल्या तारखेपासून देण्यात यावे तसेच १ हजार रुपये अर्जाचा खर्च द्यावा असा आदेश अर्जुनी-मोरगावचे न्यायदंडाधिकारी भ.म.कारलेकर यांनी १४ जानेवारी रोजी दिले. ममीतातर्फे अ‍ॅड. पोमेश रामटेके तर दुधरामच्या वतीने अ‍ॅड. कापगते यांनी युक्तीवाद केला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The second wife also belongs to Potgius