शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST

जिल्ह्यात शनिवारी (दि.२९) ९० बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ६० नवीन रुग्णांची नोंद झाली. दोन रुग्णांचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी दुसरीकडे मात्र बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे ही बाब थोडी चिंताजनक आहे. बाधितांचे मृत्यूचे सत्र थांबत असल्याने मृत्युदर १.६१ टक्क्यावर पोहोचला आहे.

ठळक मुद्दे९० बाधितांनी केली मात : ६० नवीन रुग्णांची नोंद; २ बाधितांचा झाला मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  :  मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत आहे, तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरासह ग्रामीण भागातसुध्दा बाधितांची संख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आता जिल्ह्यात पूर्णपणे ओसरायला लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. ही जिल्हावासीयांसाठी समाधानकारक बाब असली तरी नागरिकांनी पूर्वीइतकीच काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात शनिवारी (दि.२९) ९० बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ६० नवीन रुग्णांची नोंद झाली. दोन रुग्णांचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी दुसरीकडे मात्र बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे ही बाब थोडी चिंताजनक आहे. बाधितांचे मृत्यूचे सत्र थांबत असल्याने मृत्युदर १.६१ टक्क्यावर पोहोचला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असला तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी अधिक काळजी घेत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १,६२,६४४ जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,३७,१९५ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,५६,८३१ नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १,३५,९७६ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,५९० कोरोनाबाधित आढळले, त्यापैकी ३९,५३८ जणांनी कोरोनावर मात केली. सद्य:स्थितीत ३६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ६८१ जणांचे चाचणी अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.१८२८ चाचण्या; ६० पॉझिटिव्ह - कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी ६६० आरटी-पीसीआर आणि ११४८  रॅपिड अँटिजन अशा एकूण १८२८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ६० कोरोनाबाधित आढळले. बाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट ३.२८ टक्के आहे. प्रयोगशाळेत आता दोन आरटी-पीसीआर मशीन - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणखी एक आरटी-पीसीआर चाचणी मशीन दाखल झाली. यामुळे आता प्रयाेगशाळेत दररोज १८०० ते २२०० चाचण्या करणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित राहण्याची समस्या मार्गी लागणार आहे. २ लाख ४० हजार नागरिकांनी केले लसीकरण - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यातील १४० केंद्रावरुन लसीकरण केले जात आहे. यातंर्गत आतापर्यंत २ लाख ४० हजार ९३६ नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या