बलात्काराचा प्रयत्नात ‘सरपंचा’ला दोन वर्षांचा कारावास

By Admin | Updated: March 13, 2017 00:16 IST2017-03-13T00:16:58+5:302017-03-13T00:16:58+5:30

डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिखली येथील एका २१ वर्षाची महिला मोहफुल वेचण्यासाठी गेली असता

Sarpanch gets two years in jail in rape attempt | बलात्काराचा प्रयत्नात ‘सरपंचा’ला दोन वर्षांचा कारावास

बलात्काराचा प्रयत्नात ‘सरपंचा’ला दोन वर्षांचा कारावास

गोंदिया : डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिखली येथील एका २१ वर्षाची महिला मोहफुल वेचण्यासाठी गेली असता तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला आहे. सुरीचंद उर्फ सरपंच चिंतामन भोयर (३५) रा. पांढरी ह.मु. चिखली असे आरोपीचे नाव आहे.
ती १८ मार्च २०११ च्या सकाळी ६ वाजता मोहफुल वेचण्यासाठी ती महिला गेली असताना आरोपीने तिला एकटी पाहून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३५४, ३७६,५०६, ५११ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात प्रमुख जिल्हासत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी या प्रकरणावर सुनावणी केली. या प्रकरणातील आरोपी सरपंचला कलम ३५४ अंतर्गत २ वर्षाचा कारावास तर २५ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ६ महिन्याची शिक्षा सुनावली. यापैकी २४ हजार रूपये पिडीतेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक राकेशचंद्र कलासागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या देखरेखीखाली सीएमएस सेलच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Sarpanch gets two years in jail in rape attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.