शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

साखरीटोला-सातगाव, गांधीटोला रस्त्याची दुर्गती

By admin | Updated: December 17, 2015 01:50 IST

सालेकसा तालुक्यातील साखरीटोला-सातगाव-गांधीटोला रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी गिट्टी उखडल्याने सदर रस्त्याने प्रवास करणे प्रवाशांना कठिण झाले आहे.

साखरीटोला: सालेकसा तालुक्यातील साखरीटोला-सातगाव-गांधीटोला रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी गिट्टी उखडल्याने सदर रस्त्याने प्रवास करणे प्रवाशांना कठिण झाले आहे. मात्र रस्त्याचे अजूनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे सदर मार्ग केव्हा होणार, असा प्रश्न ग्रामवासीयांना पडला आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून साखरीटोला ते तिरखेडी मार्गाला मंजूरी मिळून सहा महिन्यांचा कालावधी लोटला. त्यानुसार कंत्राटदाराने तिरखेडी ते गांधीटोल्यापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र मागील तीन महिन्यांपासून गांधीटोला ते साखरीटोला मार्ग तसाच पडून आहे. सदर बांधकामाचा निधी संपल्याची ओरड करुन कंत्राटदाराने काम केले नाही. हा डांबर रस्ता उखडून मातीमिश्रीत गिट्टीचा मलबा सदर मार्गावर टाकला व रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावरील गिट्टी निघाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. मध्यंतरी कंत्राटदारामार्फत काम चालू करण्यात आले होते. मात्र मातीमिश्रीत खडी व मलब्याचा वापर होत असल्याने सातगाव येथील काही लोकांनी काम थांबविले होते. त्यामुळे सध्या काम बंद असून सदर मार्ग केव्हा बनणार असा प्रश्न ये-जा करणाऱ्यांना पडला आहे. सारखीटोला ते सालेकसा असा तालुक्याचा मार्ग असून अनेक गावकऱ्यांना नेहमी सालेकसा येथे विविध कामासाठी जावे लागते. तसेच सदर मार्गावर असणाऱ्या गावातील विद्यार्थी शिक्षणाकरिता साखरीटोला येथे येत असतात. त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)