९०३ विद्यार्थ्यांचा आरटीई प्रवेश अडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:42+5:30
हजारो पालक आपल्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेशात क्रमांक लागावा यासाठी धडपडत आहेत. ११ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज करण्यात आले होते.२५ टक्के मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ११ ते २९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान पालकांनी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी केली होती. त्या अर्जाची सोडत १७ मार्च रोजी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली.

९०३ विद्यार्थ्यांचा आरटीई प्रवेश अडला
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. गोंदिया राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १९ दिवसात पुढच्या वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत दिली होती. यात जिल्ह्यातील ९०३ जागांसाठी ३ हजार ६५८ अर्ज आले आहेत. त्या मोफत प्रवेशाची सोडत ऑनलाईन पध्दतीने १७ मार्च रोजी करण्यात आली. यात ९०३ जणांचा प्रवेश निश्चीत करण्यासाठी त्यांना ३१ मार्च ही मुदत देण्यात आली होती. परंतु १३ मे येऊनही विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली नाही.
हजारो पालक आपल्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेशात क्रमांक लागावा यासाठी धडपडत आहेत. ११ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज करण्यात आले होते.२५ टक्के मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ११ ते २९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान पालकांनी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी केली होती. त्या अर्जाची सोडत १७ मार्च रोजी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली.
जिल्ह्यातील १४० शाळांनी यासाठी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश मिळणार आहे. आमगाव तालुक्यातील ११ शाळांमध्ये ८७ जागेसाठी ४०६ अर्ज, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ शाळांमधील ९१ जागेसाठी २४५ अर्ज, देवरी तालुक्यातील १० शाळांमधील ५५ जागेसाठी १६१ अर्ज, गोंदिया तालुक्यातील ५७ शाळांमधील ३५६ जागेसाठी १ हजार ८२६ अर्ज करण्यात आले आहेत. गोरेगाव तालुक्यातील १५ शाळांमधील ७४ जागेसाठी २९८ अर्ज, सडक-अर्जुनी तालुक्यातील १० शाळांमधील ४५ जागेसाठी १४५ अर्ज, सालेकसा तालुक्यातील ५ शाळांमधील ४४ जागेसाठी ११८ अर्ज, तिरोडा तालुक्यातील १९ शाळांमधील १५१ जागेसाठी ४५९ अर्ज करण्यात आले आहेत.
एकूण १४० शाळांमधील ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यांची लॉटरी ऑनलाईन पध्दतीने काढण्यात आली. ज्या पाल्यांचे नंबर लागले त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. सोबत प्रतीक्षा यादी देखील दिली आहे. परंतु कोरोना संसर्गामुळे फेब्रुवारी महिन्यात होणारे अॅडमिशन मे महिना अर्धा होऊनही निश्चीत झाले नाही. समग्र शिक्षा अभियानाच्या जेव्हापर्यंत सूचना येत नाही तेव्हापर्यंत कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पालकांना शाळेत जाता येणार नाही.
ग्रीन झोनमध्ये कागदपत्रांची पडताळणी करा
आरटीई कायद्यांतर्गत ज्या पाल्यांना २५ टक्के मोफत प्रवेशासाठी लॉटरी लागली त्यांच्या पालकांना संबंधित शाळेत जाऊन कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलवणे गरजेचे आहे.जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित शाळेत जाण्याच्या सूचना देणे आवश्यक आहे. दोन महिने उशीर झालेल्या या २५ टक्के आरटीई प्रवेशाला आता सुरूवात करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.