शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांकडून ग्रामीण भागात संसर्गाचा अधिक धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

रोजगार रोजगारानिमित्त मोठ्या शहरात गेलेले तरुण गावी आल्यानंतर स्वत:चे विलगीकरण करत नाही. तर मोहल्ल्यातील गल्लीतील मुलांसोबत गप्पागोष्टी करताना दिसतात. म्हणून बाहेरून आलेल्यांनी स्वत: १५ दिवस विलगीकरण करून घ्यावे. तर ग्रामीण भागातील संसर्गाचा धोका टाळता येईल.

ठळक मुद्देविलगीकरण प्रक्रि या व्हावी : स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : ग्रामीण भागातील काही युवक व काही माणसे रोजगारासाठी पुणे-मुंबई, नागपुर यासारख्या मोठया शहरांमध्ये रोजगारासाठी जातात. मात्र कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ते आता गावाकडे परतत आहेत. मात्र त्यांची आरोग्य तपासणी केली जात नसल्याने त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस विभाग, महसूल विभागातील स्थानिक कर्मचारी यांनी या बाबींकडे लक्ष द्यावे. अशी मागणी काही स्थानिक नागरिकांनी केली आहे.रोजगार रोजगारानिमित्त मोठ्या शहरात गेलेले तरुण गावी आल्यानंतर स्वत:चे विलगीकरण करत नाही. तर मोहल्ल्यातील गल्लीतील मुलांसोबत गप्पागोष्टी करताना दिसतात. म्हणून बाहेरून आलेल्यांनी स्वत: १५ दिवस विलगीकरण करून घ्यावे. तर ग्रामीण भागातील संसर्गाचा धोका टाळता येईल. एक सामाजिक दायित्व म्हणून या भयावह रोगापासून स्वत:चा, कुटुंबियांचा व समाजाचा विचार करून विलगीकरण प्रक्रि येला सामोरे जाण्याची गरज आहे. परंतु सध्या असे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत नाही.चान्ना कोडका, नवेगावबांध व परिसरातील अनेक तरु ण रोजगारानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात जात असतात. अशा बाहेरून आलेल्यांनी स्वत:हूनच तलाठी, पोलीस स्टेशन, अंगणवाडी कार्यकर्त्यांना, आरोग्यसेविका, सेवक यांना द्यायला पाहिजे. जेणेकरून उद्या होणारा संक्र मण आजच रोखता येईल. पण असे फारसे होत नाही. बाहेरून आलेले पुढे यायला तयार नसतात. त्यांचे कुटुंबीय यात पुढाकार घ्यायला तयार नसतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका अधिक असतो.या बाबीकडे स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष दिले तर पुढे होणारा धोका वेळीच टाळता येईल.या बाबीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन, संभाव्य कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाची व राज्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. सामाजिक अंतर व गर्दी टाळणे या दोन गोष्टी जरी आपण एक जबाबदारी म्हणून पार पाडली तरच बाहेरच्या संसर्गापासून स्वत:चा कुटुंबियांचा व गावकऱ्यांचा बचाव करू शकतो. या बाबीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या