पोलिसांच्या मेहनतीवर महसूलचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:09+5:30

मोहाडी तालुक्यातील रोहा घाटावर गत काही महिन्यांपासून अवैध तस्करी जोमात सुरू आहे. जेसीबीच्या सहायाने उत्खनन करून ट्रक, ट्रॅक्टरने त्याची वाहतूक केली जाते. आतापर्यंत अनेकदा पोलिसांनी कारवाया करूनही महसूलने मात्र दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे.

Revenue water on the hard work of the police | पोलिसांच्या मेहनतीवर महसूलचे पाणी

पोलिसांच्या मेहनतीवर महसूलचे पाणी

Next
ठळक मुद्देरेती तस्करी : तक्रार देण्यास विलंब, तस्करांची पाठराखण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून याला आळा घालण्याची जबाबदारी महसूल विभागाची असतानाही पोलीस कारवाई करून तस्करांच्या मुसक्या आवळतात. मात्र या पोलिसांच्या मेहनतीवर महसूल विभाग पाणी फेरत असल्याचे दिसून येते. मोहाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत उशिरापर्यंत तक्रार देण्यात टाळाटाळ महसूल विभागाने केली. यावरून तस्कर आणि महसूलचे साटेलोटे लक्षात येत आहे.
मोहाडी तालुक्यातील रोहा घाटावर गत काही महिन्यांपासून अवैध तस्करी जोमात सुरू आहे. जेसीबीच्या सहायाने उत्खनन करून ट्रक, ट्रॅक्टरने त्याची वाहतूक केली जाते. आतापर्यंत अनेकदा पोलिसांनी कारवाया करूनही महसूलने मात्र दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. गुरूवारच्या रात्री रोहा घाटावर अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, पोलीस उपनिरीक्षक निशांत मेश्राम आपल्या पथकासह रोहा घाटावर पोहचले. विना क्रमांकाच्या पिवळ्या रंगाच्या जेसीबीने उत्खनन सुरू होते. त्या ठिकाणी विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर आणि दोन टिप्पर आढळून आले. मात्र पोलिसांचे पथक पोहचताच विश्वनाथ वासूदेव बांडेबुचे यांच्यासह ट्रॅक्टर, टिप्पर, जेसीबी चालक पसार झाले.
पोलिसांनी या प्रकाराची माहिती महसूल विभागाला दिली. परंतु नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचे दिसून आले. गुरूवारी रात्री कारवाई करूनही शुक्रवारी रात्रीपर्यंत या प्रकरणात तक्रार देण्यास महसूलकडून टाळाटाळ होत होती. पोलीस आपला जीव धोक्यात घालून घाटावर जावून कारवाई करतात. महसूल विभागाला त्याची सूचना देतात. परंतू आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याने महसूल विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. याप्रकरणातही एक दिवस उशिराने मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

महसूल विभागाचे पथक कुचकामी
रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने विविध पथक तयार केले आहे. मात्र या पथकांची कारवाई दिसून येत नाही. उलट ठिकठिकाणी पोलीसच कारवाई करताना दिसतात. महसूलचे पथक केवळ वसुलीच्या मागे दिसून येते.

Web Title: Revenue water on the hard work of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस