पित्याच्या हत्येचा उगवला सूड; तरुणाने तलवारीने घाव घालून केली मारेकऱ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 20:26 IST2026-03-18T19:23:04+5:302026-03-18T20:26:57+5:30

Gondia : वडिलांच्या खुनातील आरोपीचा तलवारीने घाव घालून मुलाने खून केल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील ग्राम पालेवाडा-हेटी येथे सोमवारी (दि. १६) रात्री ८ वाजता घडली.

Revenge for father's murder; Youth stabs killer to death with sword | पित्याच्या हत्येचा उगवला सूड; तरुणाने तलवारीने घाव घालून केली मारेकऱ्याची हत्या

Revenge for father's murder; Youth stabs killer to death with sword

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
वडिलांच्या खुनातील आरोपीचा तलवारीने घाव घालून मुलाने खून केल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील ग्राम पालेवाडा-हेटी येथे सोमवारी (दि. १६) रात्री ८ वाजता घडली. देवेंद्र उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम (वय २५, रा. पालेवाडा-हेटी) असे मृताचे नाव आहे.

आरोपी सुनील आसाराम कांबळे (वय २७) याच्या वडिलांचा सन २०२५ मध्ये खून झाला असून, देवेंद्र ताराम याच्यावर आरोपीच्या वडिलांच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्याला अटक करून कारागृहात पाठविण्यात आले होते. मात्र, तो आठ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून गावात आला होता. याचाच बदला घेण्यासाठी सुनील कांबळे संधीच्या शोधात होता. सोमवारी रात्री संधी साधून आरोपीने देवेंद्रवर तलवारीने गळा, मान, हात, पाय व पोटावर वार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम २५, (२), २७ (३), ४ भारतीय न्याय संहितेचे कलम १०३ (१), ५ , ३ (५), ६, ५४ अन्वये गुन्हा दाखल केला.

पोलिस पाटलासमोर कबुली

घटनेनंतर आरोपी सुनील कांबळे हा थेट गावातील पोलिस पाटील परिमल ठाकूर यांच्या घरी गेला. त्यावेळी त्याच्या हातातील तलवार रक्ताने माखलेली होती. 'माझ्या वडिलांचा जसा खून केला, तसाच मी भुरुला मारले,' अशी कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी काय आढळले?

पोलिस पाटील व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले असता, देवेंद्र ताराम हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या. कोणतीही हालचाल नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

भावाचा सहभाग संशयात

या हत्येत आरोपीचा मोठा भाऊ हंसराज कांबळे (४३) याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्षदर्शीनी तो घटनास्थळी उपस्थित असल्याचे सांगितले असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Web Title : बेटे ने पिता की हत्या का बदला लिया, तलवार से गोंदिया में हत्या।

Web Summary : गोंदिया में, एक बेटे ने अपने पिता के कथित हत्यारे को तलवार से मार डाला। मूल हत्या के लिए जमानत पर रिहा हुए पीड़ित पर हमला किया गया। आरोपी ने पुलिस के सामने कबूल किया।

Web Title : Son avenges father's murder, kills accused with sword in Gondia.

Web Summary : In Gondia, a son murdered his father's alleged killer with a sword. The victim, out on bail for the original murder, was attacked. The accused confessed to police.