शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गरज १०० कोटीची दिले केवळ ३० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा या दोन्ही विभागाची जिल्ह्यात एकूण १०६ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ६६ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन १४ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदी केला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची आर्थिक कोंडी : सावकारांच्या दारात पुन्हा शेतकरी, महिन्याभरापासून शेतकऱ्यांचे चुकारे थकले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आत्तापर्यंत १४ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदी केली. खरेदी केलेल्या धानाची किमत ३०० कोटी रुपये असून यापैकी दोनशे कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले. तर शंभर कोटी रुपयांचे चुकारे मागील महिनाभरापासून थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर शासनाने बुधवारी (दि.२२) जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मात्र गरज शंभर कोटी रुपयांची असताना केवळ ३० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने त्याचे वाटप करायचे कसे असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा या दोन्ही विभागाची जिल्ह्यात एकूण १०६ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ६६ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन १४ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदी केला आहे. खरेदी करण्यात आलेल्या धानाची किमत ३०० कोटी रुपये आहे.यापैकी दोनशे कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र मागील महिनाभरापासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला शासनाकडून शंभर कोटी रुपयांचे चुकारे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे.विशेष म्हणजे सध्या रब्बी हंगामातील धानाची रोवणी सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वी खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. आठ दहा दिवसांत विक्री केलेल्या धानाचे चुकारे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ती पूर्णपणे फोल ठरली.मागील महिनाभरापासून विक्री केलेल्या धानाचे चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांना आपली गरज भागविण्यासाठी नातेवाईकांकडे उधार उसनवारी करावी लागत आहे. तर काही शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घेऊन गरज भागवावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.त्यातच शंभर कोटी रुपयांच्या निधीची गरज असताना शासनाने केवळ ३० कोटी रुपयांचा निधी दिल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांची पायपीट कायममागील महिनाभरापासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी दररोज बँक आणि शासकीय धान खरेदी केंद्राच्या पायऱ्या झिजवित आहे.तर बँकेचे अधिकारी त्यांना चुकारे आले नसल्याचे सांगत परत पाठवित असल्याचे चित्र आहे.खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्रीशासनाने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले. मात्र शासकीय धान खरेदी केंद्रावर महिना महिनाभर धानाचे चुकारे मिळत नसल्याने अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रती क्विंटल मागे हजार रुपयांचे नुकसान होत आहे. एकंदरीत निधी मिळत नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.लोकप्रतिनिधी घेणार का दखलजिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना महिना महिनाभर चुकारे मिळत नसल्याने त्यांना अल्प दरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. तर काही शेतकऱ्यांना आपली गरज भागविण्यासाठी पुन्हा सावकारांच्या दारात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी केली जात आहे.याची लोकप्रतिनिधी दखल घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी