जिल्ह्यातील १३७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:06+5:30

जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर आता जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोना मुक्त राहवा यासाठी जिल्हा आणि प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होणारे कार्यक्रम, आठवडी बाजार रद्द केले असून जिल्ह्याच्या सीमा सुध्दा सील करण्यात आल्या आहेत.

Report of 137 swab samples in the district negative | जिल्ह्यातील १३७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यातील १३७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह

ठळक मुद्देदोन नमुन्यांचा अहवाल अप्राप्त : कोरोना उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १३९ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी १३७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल रविवारपर्यंत (दि.१९) आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला असून १३७ नमुने हे कोरोना निगेटिव्ह आले आहे.
तर दोन नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे. आत्तापर्यंत पाठविलेले सर्व स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर आता जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोना मुक्त राहवा यासाठी जिल्हा आणि प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होणारे कार्यक्रम, आठवडी बाजार रद्द केले असून जिल्ह्याच्या सीमा सुध्दा सील करण्यात आल्या आहेत. तर गावागावात कोरोनाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तसेच प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक फवारणी, मास्कचा वापर, वांरवार साबणाने हात धुण्याच्या सूचना नागरिकांना केल्या जात आहे.
यामुळेच मागील २५ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोना मुक्त जिल्हा ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाकडून करण्यात असलेल्या पॉझिटिव्ह प्रयत्नांमुळे गोंदिया जिल्हा हा कोरोना निगेटिव्ह होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.

शासकीय क्वारंटाईन कक्षात १९ जण
जिल्ह्यातील दोन शासकीय क्वारंटाईन केंद्रात सध्या १९ व्यक्ती उपचार घेत आहेत. यामध्ये गोंदिया आयुर्वेदिक महाविद्यालय १२ आणि चांदोरी ७ अशा एकूण १९ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजीव दोडके यांनी दिली.

Web Title: Report of 137 swab samples in the district negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.