शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागात अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. पशुसंवर्धन विभागात १५७ मंजूर पदांपैकी ९७ पदे रिक्त आहेत. वर्ग १ चे जिल्हा पशुधन उपायुक्त १ पद, सहायक आयुक्त पशुसंवर्धन १ पद, पशुधन विकास अधिकारी (राज्यस्तरीय) ४ पदे, पशुधन विकास अधिकारी (स्थानिकस्तर) ३२ पदे रिक्त आहेत. तर एकूण मंजूर पदे ७२ आहेत.

ठळक मुद्देभरतीचा मुहूर्त सापडेना : २०१९ मध्ये निघाली होती भरतीची जाहिरात, पशुपालकांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : गोंदिया जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली असून रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची भरती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागात अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे.पशुसंवर्धन विभागात १५७ मंजूर पदांपैकी ९७ पदे रिक्त आहेत. वर्ग १ चे जिल्हा पशुधन उपायुक्त १ पद, सहायक आयुक्त पशुसंवर्धन १ पद, पशुधन विकास अधिकारी (राज्यस्तरीय) ४ पदे, पशुधन विकास अधिकारी (स्थानिकस्तर) ३२ पदे रिक्त आहेत. तर एकूण मंजूर पदे ७२ आहेत.वर्ग ३ ची मंजूर पदे ३७ असून त्यापैकी ११ पदे भरली आहेत. तरीही सहायक पशुधन विकास अधिकाºयांचे १८ पदे रिक्त आहेत. वरिष्ठ सहायकाचे १ पद, वरिष्ठ लिपीक ३ पदे, कनिष्ठ लिपीक २, वाहनचालक २ अशी २३ पदे रिक्त आहेत. वर्ग ४ ची मंजूर पदे ४८ असून भरलेली पदे १५ आहेत. रिक्त पदांत २५ परिचर, व्रनोचारक ६ पदे, रात्र पहारेकरी १, स्वच्छक १ अशी एकूण ३३ पदे रिक्त आहेत.या रिक्त पदांमुळे पशुसंवर्धन विभाग कार्यालयांतील कर्मचाºयांना कामाचा अधिक ताण पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांना आल्यापावलीच परतावे लागत आहे. जनावरांची उत्कृष्ट पैदास व्हावी म्हणून कृत्रीम रेतनासाठी शेतकरी बांधवांना दुभत्या जनावरांची सेवाशुश्रृषा करण्यासाठी खाजगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील पशुधन कार्यालयाची प्रशस्त इमारत शोभेची वास्तू ठरली आहे.लेखी परीक्षा घेतलीच नाहीविशेष म्हणजे, पशुसंवर्धन विभागात रिक्त पदांच्या भरतीसाठी सन २०१९ मध्ये जाहिरातीच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार बेरोजगार युवकांनी लाखोंच्या संख्येत अर्ज केले होते. मात्र एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली नाही. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.