शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

पाच महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 06:00 IST

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका गोरेगाव तालुक्याला बसला असून या तालुक्यात ११८ घरे आणि २७ गोठ्यांची पडझड झाली. धानपिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुजारीटोला ४ चे तर कालीसरार धरणाचे २ दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले. मागील सात आठ दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली.

ठळक मुद्देपुजारीटोला, कालीसरार धरणाचे दरवाजे उघडले : गोरेगाव तालुक्यात ११८ घरांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात शनिवारी दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तीन तालुक्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका गोरेगाव तालुक्याला बसला असून या तालुक्यात ११८ घरे आणि २७ गोठ्यांची पडझड झाली. धानपिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुजारीटोला ४ चे तर कालीसरार धरणाचे २ दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले.मागील सात आठ दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. आमगाव, गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील काही गावांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. त्यामुळे या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून मागील चौवीस तासात १०५९.मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव ११४ मि.मी, कुºहाडी महसूल मंडळात ८३.२० मि.मी.पावसाची नोंद झाली. तर आमगाव तालुक्यातील आमगाव ७८.८० आणि ठाणा महसूल मंडळात ९०.३० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तिरोडा तालुक्यातील एकमेव वडेगाव महसूल मंडळात ६८.८० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद गोरेगाव तालुक्यात झाली असून पावसामुळे ११८ घरे आणि २७ गोठ्यांची पडझड झाली आहे.पावसामुळे धानपिक झोपल्याने पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे या तालुक्यावर ओला दुष्काळासारखी स्थिती आहे.रविवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे धान पिकांवरील किडरोगांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रविवारी सकाळी पुजारीटोला धरणाचे ४ तर कालीसरार धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.त्यामुळे वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठालगतच्या गावातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.धानपिकाला सर्वाधिक फटकासध्या धान पिक भरण्याच्या स्थितीत असून आता पावसाची गरज आहे. मात्र शनिवारी झालेल्या जोरदार पावसाचा फटका धानपिकाला बसला. पाऊस आणि वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात धान बांध्यामध्ये झोपून गेले. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

अनेक भागाचा विद्युत पुरवठा खंडीतशनिवारी दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा रात्रभर खंडीत होता. त्यामुळे अनेकांना मच्छरांच्या सानिध्यात रात्र जागून काढावी लागली. तर शहरातील काही भागात झाडांची सुध्दा पडझड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.

नुकसानीचे सर्वेक्षण सुरूअतिवृष्टीमुळे आमगाव, तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यात घरे आणि गोठ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. तर पिकांचे सुध्दा नुकसान झाले.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महसूल आणि कृषी विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली आहे.

टॅग्स :agricultureशेती