शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

जिल्ह्यातील ७४ जणांना केले रुग्णालयात क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:00 AM

दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर हायअर्लट करण्यात आले असून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. या कार्यक्रमाच्या कालावधीत दिल्ली निजामुद्दीन येथे प्रवास करणारे काही प्रवाशी सुध्दा या नागरिकांच्या संपर्कात आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्दे५९ जणांचे अहवाल अप्राप्त : २५५ जण प्रशासनाच्या देखरेखेखाली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिल्ली एका धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान दिल्ली-निजामुद्दीम येथे प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यांना गोंदिया येथील आयुर्वेदीक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तर गोंदिया येथील कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्यांना सुध्दा येथे ठेवण्यात आले असून सध्या एकूण ७४ जणांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर ५९ जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर हायअर्लट करण्यात आले असून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. या कार्यक्रमाच्या कालावधीत दिल्ली निजामुद्दीन येथे प्रवास करणारे काही प्रवाशी सुध्दा या नागरिकांच्या संपर्कात आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील अशा प्रवाशांचा शोध घेवून त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम जिल्हा आणि आरोग्य विभागातर्फे दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत या कालावधीत प्रवास करणाºया एकूण ३७ प्रवाशांची ओळख पटली असून या सर्वांना कुडवा परिसरातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने या सर्वांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. तर गोंदिया येथील गणेशनगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले होते. या बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या २२ जणांना सुध्दा आयुर्वेदीक महाविद्यालयात क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे.यांचेही नुमने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यांचा सुध्दा रिर्पोट अद्याप प्राप्त झाला नाही. जिल्हा आरोग्य विभागाला जिल्ह्यातील ५९ जणांच्या रिर्पोटची प्रतीक्षा आहे.२५५ जण देखरेखेखालीजिल्ह्यात विदेशातून प्रवास करुन आलेल्या एकूण प्रवाशांची संख्या २२२ होती. तर या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या ९३१ ऐवढी होती. मात्र यापैकी ७७ प्रवाशांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रवाशांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यामुळे आता विदेशातून आलेले प्रवाशी व त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण २५५ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर प्रशासनाची नजर आहे.बाधित युवकाच्या प्रकृतीत सुधारणाशहरातील गणेशनगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे २७ मार्चला स्पष्ट झाले. त्यानंतर युवकाला आरोग्य विभागाने येथील शासकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मागील सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.आतापर्यंत १७ जणांचे नमुने निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १८ जणांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १८ जणांचे रिर्पोट प्राप्त झाले असून १७ जणांचे नमुने निगेटिव्ह तर १ नमूना पॉझिटिव्ह आढळला. जिल्ह्यात कोरोना बाधीत नवीन रुग्णांची नोंद आत्तापर्यंत झालेली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल