गरज पडल्यास पुजारीटोलाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:00:23+5:30

गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील ५ पाणी टाकीतून ११ दशलक्ष लीटर पाणी पुरविले जाते. यामध्ये प्रती व्यक्ती १३५ लीटरप्रमाणे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी मजिप्रा ग्राम डांर्गोली येथील वैनगंगा नदीतून पाणी घेते. जिल्ह्यात पावसाळ््यात चांगला पाऊस पडल्यास प्रकल्प व नदीनाले भरून राहिल्याने उन्हाळ््यात पाणी टंचाई जाणवत नाही.

Pujaritola water if needed | गरज पडल्यास पुजारीटोलाचे पाणी

गरज पडल्यास पुजारीटोलाचे पाणी

ठळक मुद्देमजिप्राने केले पाण्याचे आरक्षण : शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी नियोजन पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मागील २ वर्षांपासून पुजारीटोला धरणाचे पाणी आणत आहे. यंदा मात्र सध्यातरी वैनगंगा नदीला पाणी असल्यामुळे तशी गरज पडलेली नाही. मात्र मे व जून महिन्यात काय स्थिती निर्माण होते हे सांगता येत नसल्याने गरज पडल्यास शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पुजारीटोलाचे पाणी आणावे लागणार आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण करून ठेवले आहे.
गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील ५ पाणी टाकीतून ११ दशलक्ष लीटर पाणी पुरविले जाते. यामध्ये प्रती व्यक्ती १३५ लीटरप्रमाणे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी मजिप्रा ग्राम डांर्गोली येथील वैनगंगा नदीतून पाणी घेते. जिल्ह्यात पावसाळ््यात चांगला पाऊस पडल्यास प्रकल्प व नदीनाले भरून राहिल्याने उन्हाळ््यात पाणी टंचाई जाणवत नाही. मात्र मागील २ वर्षांत पावसाच्या अनियमितपणामुळे नदी-नाले आटले व परिणामी गोंदिया शहराची तहान भागविण्यासाठी मजिप्राला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातील पाणी सोडून ते वैनगंगेत आल्यानंतर गोंदिया शहराची तहान भागविता आली होती.
यंदा मात्र सध्या तरी वैनगंगा नदीत पाणी असल्याने पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याची पाळी मजिप्रावर आलेली नाही. आता मे महिन्याची सुरूवात झाली असून पूर्ण महिना शिल्लक आहे. तसेच जून महिन्यातही कडक उन्हाळा राहतो व या महिन्यांत काय स्थिती निर्माण होते हे आतापासूनच सांगता येणे कठीण आहे. मात्र असे असतानाही मजिप्राने शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी आरक्षीत केले आहे. येत्या दिवसांत काय स्थिती निर्माण होते ते बघून पुढे काय करायचे याबाबतचे नियोजन मजिप्राने केले आहे. म्हणजेच गरज पडल्यास पुजारीटोला प्रकल्पाचे पाणी मागवून गोंदिया शहरवासीयांची तहान भागविली जाणार आहे.

बंधारा बांधकामामुळे पाणी पातळीत वाढ
वैनगंगा नदीतील पाणी संपल्यास मजिप्राला पुजारीटोला प्रकल्पातील पाण्यासाठी धाव घ्यावी लागते. मात्र ही वेळ येवू नये यासाठी मजिप्राने नदीत २५ एप्रिलपासून बंधारा बांधून पाणी अडविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली असून पुजारीटोला प्रकल्पाचे पाणी घेण्याची वेळ आली नाही. शिवाय कॅनलला पाणी सोडण्यात आले असून त्यामुळेही नदीत पाणी असल्याचे मजिप्राचे विभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी सांगीतले. मात्र येत्या काळात गरज पडल्यास मजिप्राने नियोजन केले असून पुजारीटोला प्रकल्पातील आरक्षीत केलेले पाणी मागविता येईल असेही त्यांनी सांगीतले.
प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा
आजघडीला जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात ३१.८१ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी याच काळात १९.९० टक्के पाणीसाठा होता. सिरपूर प्रकल्पात ३०.२० टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी २१.५८ टक्के पाणीसाठा होता. तर पुजारीटोला प्रकल्पात ५२.७८ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी २०.८८ टक्के पाणीसाठा होता. तर यंदा कालीसरार प्रकल्पात पाणीसाठा नसून मागील वर्षी मात्र ४०.१३ टक्के पाणीसाठा होता.

Web Title: Pujaritola water if needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.