शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीचा प्रचार सोशल मीडियावर

By admin | Updated: October 28, 2015 02:02 IST

जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून संधी दिल्यास या भागाचा विकास करण्यास आपणच कसे सक्षम आहोत,

लाखांदूर : जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून संधी दिल्यास या भागाचा विकास करण्यास आपणच कसे सक्षम आहोत, अशा प्रचाराचा व्हॉटसअ‍ॅप या सोशल मीडियावर धूर उडाला आहे. या निवडणुकीत सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती आहेत.जिल्ह्यात तीन नगरपंचायतींची स्थापना होऊन मोहाडी, लाखनी, लाखांदूर येथे नगर पंचायतींची प्रथमच निवडणूक होत आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्याच पक्षाने जिंकावी, अशी अपेक्षा सर्वच पक्षांचे पदाधिकारी व्यक्त करीत असून त्यादृष्टिने मोर्चेबांधणी सुरू झाली असून मतांचा जोगवा मागणे सुरू आहे. या निवडणुकीसाठी सर्व फंडे उमेदवार आजमावित आहेत. प्रभागातील मतदारांचे मोबाईलवर तसेच विविध व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर गूड मॉर्निंगपासून ते गूड नाईटपर्यंत शुभेच्छा मेसेजचा वर्षाव सुरू झाला आहे. विविध ठिकाणी सोशल मिडियावरील प्रचार चांगलाच रंगात आला आहे. निवडणूक होत असल्याने तिन्ही नगरपंचायतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, बसपा यासह विविध राजकीय पक्षाच्या संघटना व अपक्ष उमेदवारांचा बोलबाला दिसत आहे. जिल्ह्यात तीन नगर पंचायतींचे गठन झाल्यानंतर आतापर्यंत यापूर्वीच्या ग्रामपंचायतींवर काहींची मक्तेदारी होती. परंतु आता नवीन नगरपंचायत निर्माण होऊन या ठिकाणी निवडून येणारे नगरसेवक म्हणून जनतेत वावरणार आहेत. यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू असतानाच निवडणूक प्रचाराचा नवा फंडा आता नगरपंचायतीच्या निवडणुकीत सोशल मीडियाची धूम सुरू आहे. येत्या आठ दिवसांत प्रभागातील नगरसेवक कोण असणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे. विविध प्रभागातील लढतीचे चित्र अस्पष्ट आहे. गावागावात प्रचाराचे आघाडी घेतली आहे. ताई माई आक्का अमुक चिन्हावर मारा शिक्का, असा स्वरुपाचा प्रचार आता कालबाह्य झाला असला तरी सोशल मीडियावरील प्रचाराने जोर पकडला आहे. विविध ग्रुपच्या माध्यमातून उमेदवार आपला संदेश पोहचवून विकास कामे, नियोजित विकास कामाचा आराखडा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)