शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयतेसाठी पब्लिक कॉल रिस्पॉन्स

By admin | Updated: February 1, 2016 01:53 IST

महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कार्य करीत असले तरी देखील कोणत्या न कोणत्या प्रकारे महिला व तरुणींवर अत्याचार वाढतच आहे.

रामनगर पोलिसांचा उपक्रम : महिलांसाठी लावल्या तक्रारपेट्यानरेश रहिले  गोंदियामहिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कार्य करीत असले तरी देखील कोणत्या न कोणत्या प्रकारे महिला व तरुणींवर अत्याचार वाढतच आहे. अशात महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच जनतेलाही निर्भयतेने वागता यावे यासाठी रामनगर पोलिसांनी पब्लिक कॉल रिस्पॉन्स हा उपक्रम सुरू केला आहे. गोंदिया शहरातील शाळा-महाविद्यालय व गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनींना असुरक्षित वाटू नये तसेच त्या मुलींना त्रास देणाऱ्यांच्या विरोधात नाव गुपित ठेवता सहजरीत्या तक्रार करता यावी यासाठी रामनगर पोलिसांनी उत्तम युक्ती शोधून काढली आहे. यासाठी पोलिसांनी मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, नमाद महाविद्यालय यासह शहरातील शाळा-महाविद्यालयांत कार्यक्रम घेवून विद्यार्थिनींमध्ये जागृती घडवून आणली. मुलींना त्रास देण्याचे काम कुणाकडून होत असेल तर त्या व्यक्तिची तक्रार पोलिसांकडे करा असे आवाहन करण्यात आले. परंतु अनेक तरुणी बदनामीपोटी पोलिस ठाण्यात जात नसल्यामुळे त्यांच्यासाठी शहरातल्या मुख्य आठ ठिकाणी तक्रार पेट्या लावल्या आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी १०९१ ही हेल्पलाईन तयार करण्यात आली असून महिलांच्या मदतीसाठी दोन व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देण्यात आले (९१३००३०५४८, ९१३००३०५४९) आहेत. शासनाने या पब्लिक कॉल रिस्पॉन्सकरिता एक चारचाकी वाहन पाठविले आहे. सोबतच दोन अत्याधुनिक मोटारसायकल राहणार आहेत. एक अधिकारी, एक महिला, एक पुरूष कर्मचारी त्या व्हॅनवर राहणार आहेत. दोन मोटारसायकलवर चार कर्मचारी २४ तास सेवा देणार आहेत. या वाहनावर बसणाऱ्या पोलीसानकडे सायरन वाजणार असून ते शस्त्रधारी राहणार आहेत. वॉकीटाकी त्यांच्याकडे असणार आहे. कोणत्याही ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी पोहोचण्याचे काम या व्हॅनवरील व मोटारसायकलवरील कर्मचारी उपस्थित राहाणार आहेत. या क्रमांकावर महिलांनी एक एसएमएसही तक्रार स्वरुपात पाठविला तर त्याची वेळीच दखल घेतली जाईल. या प्रकरणातील तक्रारकर्ती महिला किंवा तरुणीचे नाव गुपित ठेवले जाणार आहे. आलेल्या तक्रारीची शहानिशा केल्यावर सदर प्रकार घडल्याचे तपासी अमलदाराच्या लक्षात येताच त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही रामनगर पोलिस करणार आहेत. महिलांवरील अत्याचारावर आळा बसावा म्हणून रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विविध मुख्य चौकात आठ तक्रार पेट्या लावण्यात आल्या आहेत. त्यावर हेल्पलाईन क्रमांक व व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही नोंदविण्यात आला आहे. महिलांनी घेतली नियंत्रण कक्षाची परीक्षारामनगर पोलिसांचा हा उपक्रम गोंदिया शहरातील महिलांच्या लक्षात येताच महिलांनी पोलिसांच्या कार्यप्रणालित तत्परता आहे किंवा नाही हे ठाणेदारांच्या समोरच तपासून पाहिले. सुधा बनाफर, निशा पाचे व वैद्य या तिन महिलांनी हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून रामनगर पोलिस तक्रार घेत नाही असे नियंत्रण कक्षाला सांगितले. क्षणार्धात नियंत्रण कक्षातून रामनगरचे ठाणेदार साहेबराव पवार यांना नियंत्रण कक्षातील सहायक फौजदार तिवारी यांचा फोन आला आणि महिलांनी रामनगर पोलिस तक्रार घेत नाही असे सांगितले. त्यावर ठाणेदार पवार यांनी त्या महिला रामनगर पोलिस ठाण्यातच बसल्या असून त्यांनी जनतेसाठी प्रकाशित झालेल्या क्रमांकावरुन येणाऱ्या कॉलची दखल घेतली जाते किंवा नाही, अशी नियंत्रण कक्षाची परीक्षा घेतल्याचे सांगितले. सूचना पाळा, नुकसान टाळाविविध प्रकरणांना घेवून रामनगर पोलिसांनी आपल्या हद्दीतील प्रत्येक गल्लोगल्लीत जावून नागरिकांना सुचना पाळा, नुकसान टाळा अशा आशयाची सहा हजार पत्रके वाटप केली. बाहेर गावी जाताना रोख रक्कम, दागिणे घरात ठेवू नका, बाहेर गावी जाताना पोलिसांना कळवा, रात्रीच्यावेळी दिवे सुरू ठेवावे, बाहेर गावी जात असल्यास घरातील नोकर व शेजाऱ्यांना माहिती द्यावी अशा विविध प्रकारची माहिती देणाी पत्रके आहेत.