शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास अखंड वीजपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST

साखरीटोला : परिसरात वेळीअवे‌ळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यातच आता राज्य शासनाने १ जुलैपासून ...

साखरीटोला : परिसरात वेळीअवे‌ळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यातच आता राज्य शासनाने १ जुलैपासून शेतकऱ्यांना फक्त ८ तासांकरिता वीजपुरवठा करणार असल्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होणार असून २४ तास अखंड वीजपुरवठा करा अशी मागणी वीजग्राहक व शेतकऱ्यांनी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

साखरीटोला येथे ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र असून त्याद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना दररोज सकाळी ९.३० वाजतापासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत म्हणजे फक्त ८ तास वीजपुरवठा होणार आहे. पॉवरहाऊसमधून ऑटोमेटिक पद्धतीने तशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. म्हणजेच हा प्रकार शेतकऱ्यांचा घात करणारा आहे. भाजप शासन काळात लोडशेडिंग या ‘शब्दा’लाच अंतिम विराम लागले होता. त्याकाळात थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. तर त्यावर तोडगा काढून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात आले. मात्र, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा घात केला असा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत. ८ तास वीजपुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना पिकांना पाणीही देता येणार नाही. त्यात ग्रामीण परिसरात वीजदाब अत्यंत कमी राहतो. सततची नापिकी व लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता खरीप हंगामाची सुरुवात होताच वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने शेतकरी व वीजग्राहक संताप व्यक्त करीत आहेत. अशात राज्य शासन व लोकप्रतिनिधींनी याकड़े लक्ष देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करावा अन्यथा शेतकरी आंदोलनाच्या मार्गाने पुढे जाणार, अशी इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

------------

मागणीच्या तुलनेच उत्पादन कमी

मागणीनुसार विजेचे उत्पादन कमी असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्याना ८ तास वीजपुरवठा होणार आहे. असे ऑटोमेटिक शेड्यूल तयार करण्यात आले असल्याचे शाखा अभियंता पाटील यांनी सांगीतले. त्यामुळे शासननिर्णयाची अंमलबजावणी होणार असून याचा मात्र शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.