शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांविरूद्ध थोपटले दंड

By admin | Updated: February 10, 2016 02:16 IST

शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशाला मूठमाती देऊन काही परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना बनावट पावत्या दिल्याने अनेक शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहीले.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : समाजसेवकांचे उपोषण सुरूअर्जुनी-मोरगाव : शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशाला मूठमाती देऊन काही परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना बनावट पावत्या दिल्याने अनेक शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहीले. अशा सावकारांच्या विरोधात येथील समाजसेवकांनी दंड थोपटले असून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी त्यांनी सोमवारपासून (दि.८) उपोषण सुरू केले आहे. मंगळवआरी उपोषणाचा दुसरा दिवस असतानाही त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघालेला नाही. प्राप्त माहितीनुसार, शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केली. मात्र अनेक सावकारांनी कर्जदारांना सोने तारण करताना साध्या कागदावर नोंद केलेल्या पावत्या दिल्या. काही पावत्या बनावट असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. यामुळे अनेक शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत. काही कर्जदारांनी सहायक निबंधकांकडे दाद मागितली. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. उलट न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला.याविरूद्ध शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मोरेश्वर सौंदरकर यांनी दंड थोपटून आमरण उपोषण सुरू केले. वडेगाव स्टेशन येथील विजय खुणे व तिडका-करड येथील हिराजी बावने यांनी दुसऱ्या मंडपात आमरण उपोषण सुरू केले आहे. वंचित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देऊन दोषी सावकारांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच स्थानिक पोलीस स्टेशनअंतर्गत अवैध धंदे बंद करण्याची मागणी सौंदरकर यांनी आहे. सावकारांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून दोषी सावकारांचे परवाने रद्द करावे, विनापरवानाधारक परंतू व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी, वडेगाव-स्टेशन येथील पडझड प्रकरणाची पूर्ण चौकशी करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी खुणे व बावने यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)