शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

रबीचे प्रस्तावित क्षेत्र ५१.५० हजार हेक्टर

By admin | Updated: October 24, 2015 01:48 IST

सध्या खरिपाचे पीक निघायचे आहे. हलक्या धानाची कापणी सुरू झाली असून भारी धान कापणीला तयार होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.

गोंदिया : सध्या खरिपाचे पीक निघायचे आहे. हलक्या धानाची कापणी सुरू झाली असून भारी धान कापणीला तयार होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. मात्र १ नोव्हेंबरपासून रबी हंगामासाठी तयारी सुरू होणार असल्यामुळे कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे. यावर्षी रबीच्या पिकांसाठी एकूण ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.सद्यस्थितीत खरीप हंगामाच्या हलक्या धान पिकांची कापणी केवळ १० टक्केच झाली आहे. ही धान कापणी पूर्ण होताच भारी धान पिकांची कापणी सुरू होणार आहे. या धानाच्या मळणीनंतर लगेच रबी हंगामाच्या कामात जिल्ह्यातील शेतकरी गुंतणार आहेत. १ नोव्हेंबरपासून लाखोळी व जवस या रबी हंगामाच्या पिकांची लागवड सुरू होणार आहे. तर गहू व हरभरा पिकाला पाण्याची गरज असल्यामुळे त्यांची लागवड १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत शेतकरी रबी पिकांसाठी शेतीच्या कामात गुंतणार आहे.रबी हंगामासाठी गव्हू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र दोन हजार ९२० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र तीन हजार हेक्टर एवढे आहे. तर हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र चार हजार ०९० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र नऊ हजार हेक्टर आहे. कडधान्यापैकी लाखोळी, वाल, वाटाणा इत्यादीचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ८०० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र १५ हजार हेक्टर आहे. जवस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८ हजार ६३० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र १० हजार हेक्टर आहे. तर भाजीपाला पिकाचे प्रस्तावित क्षेत्र दोन हजार ५०० हेक्टर आहे. तसेच उन्हाळी धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र सात हजार ७६० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र १२ हजार हेक्टर आहे.यावर्षी वेळेवर पावसाने साथ न दिल्यामुळे खरिपात शेतकऱ्यांनी ठरविल्याप्रमाणे लाभ होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नजर आता रबीच्या हंगामावर लागून आहे. (प्रतिनिधी)