शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांचा प्रचार दंडारीतून व्हावा

By admin | Updated: January 31, 2016 01:58 IST

जिल्ह्यात २५ वर्षापूर्वी गाव तिथे दंडार होती. परंतु आता ही दंडार लोप पावत चाचली आहे.

लोकमत मुलाखत : शाहीर मधुकर बांते व नाट्य कलाकार जीवन लंजे यांचा सूरनरेश रहिले गोंदियाजिल्ह्यात २५ वर्षापूर्वी गाव तिथे दंडार होती. परंतु आता ही दंडार लोप पावत चाचली आहे. आता गोंदिया जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतक्या १४ दंडार असून त्याही शेवटच्या घटका मोजत आहेत. शासन आपल्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी टीव्हीवर जाहिरातीच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये खर्च करते. शासनाच्या विविध योजनांची प्रचार-प्रसिध्दी लोकरंजनातून करणाऱ्या लोककलावंताकडे शासन पाठ फिरवते. त्यामुळे लोककला आज ऱ्हास पावत चाचली आहे. दंडार, तमाशा, नाटक करण्यास माणसे मिळत नाही. ग्रामीण भागातील मनोरंजानाचा आत्मा म्हणून समजल्या जाणाऱ्या लोककला आता लोपपावत असल्याची खंत व्यक्ती करीत त्यांना पुनरूजीवित करण्यासाठी शासनाने योजनांच्या प्रचाराचे काम लोकलावंतांना द्यावे, अशी मागणी गोंदिया जिल्ह्याचे शाहीर मधुकर बांते व नाट्यकलाकार जीवनलाल लंजे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीतून केली आहे. स्वदेशी कला, स्वाभाविक कला या माध्यमातून लोहसहभाग यामधून समाजपरिवर्तनासाठी जनजागृती करणे, शासनाच्या विविध योजना जनसामान्यांत रूजाव्या यासाठी शासन टीव्हीवरील जाहीरातीच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये खर्च करते. जाहीरातीच्या वेळी ग्रामीण आपल्या कामधंद्यात असतात त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करूनही त्या योजना जनमाणसात रूजत नाही. त्या जाहीरातींवर खर्च होणारे पैसे शासनाने कलावंतावर खर्च करून शासकीय योजनांचा प्रचार कार्यक्रमांच्या माध्यामातून करविल्यास कलवंताना पोट भरणे शक्य होईल तर शासनाच्या योजना जनमाणसात रूजतील. ग्रामीण भागात चौकाचौकात दंडार, तमाश्या, ड्रामा, गोंधळी, गीताच्या माध्यामतून या योजनांचा संदेश लोकांपर्यत पाहेचविण्याचे हे प्रभावी माध्यम आहे. त्यासाठी शासनाने योजनांच्य प्रचाराचे काम या लोकलावंतांना देण्याची मागणी केली. शासनाच्या योजना लोकांसाठी असतात त्या लोकांनीच पटवून दिल्या तर त्याचा फायदा जास्त होईल. आमचा माणून आम्हाला सांगतो म्हणून त्या योजना जास्त लोकाभमुख होतील. गोंदिया जिल्ह्यात सेलोटपार, म्हसवानी, खोडशिवणी, गांगला, नवेगावबांध, बुध्देवाडा, कोहळीटोला आदर्श, केसलवाडा, मनोरा, बयेवाडा, भयेपार, भडंगा व हिरडामाली या ठिकाणी दंडारी आहेत. परंतु नविन पिढी दंडारीत काम करण्यासाठी माणसे मिळत नाही. शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी केली.सोंगाड्यातील हास्यमय जीवनगावातील लोकांचे सर्वाधिक प्रबोधन करणारा व्यक्ती म्हणजे सोंगाड्या. दंडारीतील महत्त्वाची भूमिका म्हणजे सोंगाड्या. तो प्रेक्षकांच्या नजरेसमोर येताच प्रत्येकाच्या ओठावर हास्य येते. हा सोंगाड्या द्विभाषेत बोलतो. त्याला ‘कोटी करणे’ असे म्हणतात. एखाद्या कथेची थिम समजून प्रसंगी विनोद करतो. या सोंगाड्याला शब्दनिष्ठ विनोद, संगितातून विनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, साहित्यातून विनोद ह्या साऱ्यांचा ताळमेळ बसवावा लागतो. हे सर्व झाले म्हणजेच लोकांचे मनोरंजन होते. अख्खे आयुष्य दंडारी, नाटक यासाठी वाहून दिलेल्या सडक-अर्जुनी तालुक्याच्या आदर्श कोहळीटोला येथील रहिवासी जीवनलाल लंजे यांनी. २० व्या वर्षीपासून भाषण देणे, गाणे लिहिणे, नाट्य अभिनय करणे हे जीवनदादा यांचे काम होते. दंडारीतून माझ्या कलेचा जन्म झाला असेही ते सांगतात. सोंगाड्याचे काम करतांना त्यांनी कोतवालाच्या भूमिकेत शेकडो मंच गाजविले. हार्मोनियम, शास्त्रीय संगीत, नाट्यअभिनयाचा धडा घेत मराठी वाकप्रचाराचा कोर्स केला. पाणी मुरविण्यावर जनजागृती ककेल्यामुळे शासनाने त्यांना १९९४ ला जलश्री आणि वनश्रीचा पुरस्कार दिला. २०० प्रौढ शिक्षण केंद्रावर संगीतातून अक्षर वर्ण शिकविले. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रात ७० कार्यक्रम केले. दुरदर्शनला ३५ कार्यक्रम केले. जल व वन या विषयावर त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना मलेशिया, सिंगापूर, थायलंड अश्या विदेशात जाण्याचा योग आला. शेकडो नाटकात नारद, श्रीकृष्ण, राम, संत तुकाराम, गोरा कुंभार, एकच प्यालातील रामलाल, लग्नाच्या बेडीतील पराग म्हणून भूमिका बजावली. तुमडीच्या गाण्याला जन्म देणाऱ्या प्रभाकर निचकवडे यांची हे गाणे त्यांनी आकाशवाणीवर गाऊन दाखविले. इतकेच नव्हे तर त्यांनी पायाला घुंगरू गाणे म्हणत नाचले व मनोरंजनातून संस्कृतीचे धडे देत जनजागृती केली.