शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कायदा आहे; पण अमलात नाही; शाळेच्या फीसाठी वावर विकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 17:59 IST

कायद्यानुसारच वाढ करणे अपेक्षित : १५ टक्के शुल्कवाढ करता येते

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : अनेक पालक जिल्हा परिषद, नगरपालिकाच्या मराठी शाळांच्या तुलनेत सेमी इंग्लिश किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश घेत आहेत. कोरोनाकाळात शासनाच्या निर्देशामुळे विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांनी शुल्कात वाढ केली नव्हती; परंतु आता जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी १० ते १५ टक्क्यांनी शुल्कात वाढ केली आहे. शुल्क वाढीवर नियंत्रणासाठी कायदा केलेला आहे. या कायद्याच्या तरतुदींनुसार फी निश्चितीची शाळांना करता येते प्रत्यक्षात अधिक वाढ होत आहे.

सध्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचेही भिजत घोंगडे आहे. त्यामुळे अनेक पालक आरटीईच्या भरवशावर न बसता, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत; परंतु पालकांना यंदा शुल्कवाढीचा सामना करावा लागत आहे. याबाबतच्या तक्रारी शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात येतात. मात्र, त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी शैक्षणिक शुल्क किती वाढवावे, त्यावर निर्बंध आहेत.

दुसरीकडे, एकूण शैक्षणिक शुल्कात १५ टक्क्यांची सवलत देण्याचा अधिकार त्या शाळेला आहे. शिक्षक- पालक संघाच्या बैठकीत जे शैक्षणिक शुल्क ठरते, त्यानुसार मुलांच्या पालकांकडून फी घेतली जाते. कोरोनाच्या संकटात जिल्ह्यातील अनेक शाळांनी फी वाढ केली नाही. मात्र आता शाळांनी फी वाढ करण्यास सुरूवात केली आहे. मात्र भरमसाट फी वाढ झाल्याने पालकांची अडचण वाढली आहे.

या शुल्कवाढीवर नियंत्रण कोणाचे?२०१४ पासून शुल्क नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्यानुसारच ही प्रक्रिया आहे. त्यामुळे सध्या प्रवेशप्रक्रियेचा विचार करणाऱ्या शाळांनी आपली शुल्क रचना जाहीर करून ती पालक शिक्षक संघाकडून मान्य करून घ्यावी, तसे न झाल्यास आणि नंतरच्या टप्प्यात त्यावर पालकांनी आक्षेप घेतल्यास संस्थाचालक आणि प्राचार्यांनाही कायदेशीर शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

जिल्ह्यात विनाअनुदानित ३५४ शाळागोंदिया जिल्ह्यात खासगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यित शाळांची संख्या ३५४ आहे. या शाळांना शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नसल्याने, त्यांना शुल्क नियंत्रण कायद्यानुसार दरवर्षी १० ते १५ टक्के शुल्क वाढ करण्याचा अधिकार आहे.

यंदा शाळांनी १० टक्क्यांनी वाढविली फीकोरानामुळे मजूर, शेतकरी, कामगार, उद्योग, व्यावसायिक सर्वच संकटात सापडले होते. त्यामुळे गत तीन वर्षांपासून अनेक शाळांनी त्यांच्या शिक्षण शुल्कात वाढ केलेली नाही. त्यामुळे यंदा बहुतांश शाळांनी १० ते १५ टक्के शुल्क वाढ करण्याचा विचार सुरू केला आहे.

पालकांची प्रतिक्रियाशिक्षण महाग झाले आहे. पुस्तके, गणवेश महाग झाले आहेत. अशा परिस्थितीत शाळा शुल्कवाढ करतात. त्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. कायदा आहे; पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही.- गजानन शिवणकर, पालक

महागडे शिक्षण परवडत नसतानाही पालक आर्थिक तडजोड करून पाल्यांना ते देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शाळांनी दरवर्षी ५ ते ८ टक्के वाढ करावी. १० ते १५ टक्के शुल्कवाढ खूप जास्त आहे. - गौरीशंकर बिसेन, पालक

कोरोनामुळे तीन वर्षांपासून फी वाढ केलेली नाही. शाळांचा खर्च वाढला आहे. शिक्षक-कर्मचाऱ्यांनाही पगारवाढीची अपेक्षा असते. महापालिकेने शाळांना टॅक्स माफ केलेला नाही. हजारो रुपये टॅक्स भरावा लागतो. १५ टक्के शुल्कवाढ करता येते; परंतु आम्ही यंदाही शुल्कवाढ केली नाही.-मनमोहन डहाटे, प्राचार्य नॅशनल पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, पिंडकेपार  

 

टॅग्स :Schoolशाळाgondiya-acगोंदिया