शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 05:00 IST

अवघ्या जगावरच सध्या करोनाचे संकट ओढावले आहे. मोठ्या झपाट्याने करोना आपले पाय पसरत असून अजघडीला लाखोंच्या संख्येत रूग्णांची संख्या आहे. तर देशातही करोनाने आपले पाय पसरण्यास सुरूवात केली असून राज्यात २६ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. करोनाचा हा धोका बघता राज्यशासनाने प्रतिबंधक उपायही कडक केले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश : शाळा, अंगणवाडी, थिएटर व कार्यक्रमांवर बंदी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : झपाट्याने पाय पसरत असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही शाळा-महाविद्यालय, अंगणवाड्या, थिएटर, तरणतलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे, म्युझियम तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांवर बंदी लावण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी रविवारी (दि.१५) आदेश काढले आहेत.अवघ्या जगावरच सध्या करोनाचे संकट ओढावले आहे. मोठ्या झपाट्याने करोना आपले पाय पसरत असून अजघडीला लाखोंच्या संख्येत रूग्णांची संख्या आहे. तर देशातही करोनाने आपले पाय पसरण्यास सुरूवात केली असून राज्यात २६ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. करोनाचा हा धोका बघता राज्यशासनाने प्रतिबंधक उपायही कडक केले आहेत. यासाठी राज्यात शुक्रवारपासून (दि.१३) साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. यांतर्गत राज्यात शहरांतील शाळा-महाविद्यालय, मॉल्स, कोचिंग क्लास, नाट्यगृह, थिएटर आदिंवर बंदी लावण्यात आली आहे.त्यानुसार, कनोरा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातही नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होत पर्यंत परवानगी देण्यात येऊ नये तसेच यापूर्वी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील चित्रपटगृह, तरणतलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह व म्युझियम सुद्धा ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी रविवारी (दि.१५) काढले. या आदेशाचे पालन न करणाºया कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८ शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येणार व पुढील कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे.शाळा-महाविद्यालय व अंगणवाडींना सुटीलोकांची गर्दी होणार याबाबतची दक्षता घेत विविध कार्यक्रम व गर्दीच्या ठिकाणांवर बंदी लावण्यात आली आहे. अशात शाळा-महाविद्यालय तसेच अंगणवाडीत विद्यार्थ्यांची गर्दी होते. ही बाब लक्षात घेत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजही शाळा तसेच महाविद्यालये व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनांवरील शैक्षणिक संस्था तसेच अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, १० व १२ वीच्या परीक्षा तसेच विश्व विद्यालयाच्या परीक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना