गर्भवती महिलेचा ६०० किमी.चा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:01:20+5:30

राज्यातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची पाळी आल्याने कित्येकांनी आपल्या गावची वाट धरली आहे. यातच एका गर्भवतीचा समावेश असून तिने तब्बल ६०० किलो मीटरचा पायी प्रवास केला आहे. ‘लॉकडाऊन’मुळे अवघ्या देशातील उद्योग धंदे बंद पडले आहेत. राज्यातही तीच स्थिती असून अशात दररोज कमावून खाणाºया मजुरांची चांगलीच अडचण झाली आहे.

Pregnant woman walks 600 km on foot | गर्भवती महिलेचा ६०० किमी.चा पायी प्रवास

गर्भवती महिलेचा ६०० किमी.चा पायी प्रवास

ठळक मुद्दे१० मजुरांचा समावेश : घराच्या ओढीने पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने ‘लॉकडाऊन’ केले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची पाळी आल्याने कित्येकांनी आपल्या गावची वाट धरली आहे. यातच एका गर्भवतीचा समावेश असून तिने तब्बल ६०० किलो मीटरचा पायी प्रवास केला आहे.
‘लॉकडाऊन’मुळे अवघ्या देशातील उद्योग धंदे बंद पडले आहेत. राज्यातही तीच स्थिती असून अशात दररोज कमावून खाणाºया मजुरांची चांगलीच अडचण झाली आहे. कामच नसल्याने राहूनही काय करायचे हा विचार करून मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. शासन मजुरांना आहे त्या ठिकाणी थांबण्यास सांगत असतानाही मजुरांचे स्थलांतरण सुरूच आहे.अशातच तेलंगाणातील हैदराबाद येथे कामासाठी गेलेल्या मध्यप्रदेश राज्यातील मजुरांनी आपले गाव गाठण्याचा निर्धार केला. विशेष म्हणजे, यामध्ये एक गर्भवती महिला व लहान मुलांचा समावेश आहे. ६०० किलोमीटरचे अंतर पायी चालत ते शनिवारी (दि.२५) गोंदियात पोहोचले आहेत. या प्रवासात हे मजूर कधी पायी, कधी आॅटोने तर कधी पाण्याच्या टँकर व ट्रकचा आधार घेत गोंदियात पोहोचले. तरिही सुमारे ६०० किलोमीटर अंतर त्यांनी पायी कापले आहे. प्रवासात अनेकदा त्यांना खायला अन्न मिळाले नाही. पण घरी परतण्याची तीव्र इच्छा व आप्त स्वकीयांची ओढ यामुळे त्यांनी हा प्रवास सुरूच ठेवला. यामध्ये त्यांचे पैसेही खर्च झाले आहेत. एवढे एंतर कापल्यानंतही त्यांना आणखी ३०० किलोमीटरचे अंतर चालून मध्यप्रदेश राज्यातील आपल्या गावी जायचे आहे. या प्रवासात प्रशासनाची दादागिरी तर कधी सहृदयतेचा अनुभव आल्याचेही त्यांनी सांगीतले.

Web Title: Pregnant woman walks 600 km on foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.