शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

वीज मंडळाचा भोंगळ कारभार

By admin | Updated: November 2, 2015 01:30 IST

येथील सर्व विज ग्राहकांना सप्टेंबर-आॅक्टोंबर महिन्याचे वीज बिलात मागील महिन्याच्या वीज बिलाची रक्कम जोडून आली.

ग्राहकांना मनस्ताप : मागील बिल जोडून पाठविले बिलदिघोरी/मोठी : येथील सर्व विज ग्राहकांना सप्टेंबर-आॅक्टोंबर महिन्याचे वीज बिलात मागील महिन्याच्या वीज बिलाची रक्कम जोडून आली. मागील महिन्यात भरलेली रक्कम कशी लागून आली असा प्रश्न सर्व वीज ग्राहकांना पडला आहे. परिणामी वीज विभागाचा अजब कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.दिघोरी/मोठी येथे डोंगरगाव विज उपकेंद्रातून विजेचा पुरवठा होत असतो. त्यामुळे विजेची रिडींग तथा देखभाल संपूर्ण डोंगरगाव उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी बघत असतात. दिघोरीतील किमान ८० टक्के वीज ग्राहाकंनी मागील महिन्याचे विज बिल भरले असताना सुध्दा या महिन्याचे बिलात मागील थकबाकी म्हणून जोडून देण्यात आले आहे. त्यामुळे येथील बँकेत वीज बिलाचा भरणा करावयाचा असल्यास संपूर्ण बिलच भरावे लागते. त्यामुळे ग्राहकांना खूप मनस्ताप झाला आहे. मागील बिल भरले असल्याची पावती दाखविल्यावर सुध्दा वीज बिल बँकेत स्विकारले जात नसल्याने ग्राहकांना डोंगरगाव उपकेंद्रात जावून वीज बिल कमी करुन आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे डोंगरगाव येथे वेळ काढून जाणे-येणे करणे यासाठी ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सुध्दा सहन करावा लागत आहे. त्यामुळे डोंगरगाव उपकेंद्रातील अधिकाऱ्यांनी स्वत: दिघोरीत कँप लावून दिघोरीतच विजबिल कमि करुन दयावे त्यामुळे विज ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार नाही.दिघोरीतच शिबिर लावून वीजेचे बिल कमी करुन दिल्यास विज मंडळाविरुध्द ग्राहकांमध्ये असलेला असंतोष कमी होण्यास मदत होईल, अशी परिसरात चर्चा आहे. (वार्ताहर)