शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह प्रयत्नांनी जिल्हा होतोय कोरोना निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:01 IST

पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. यासर्व प्रयत्नांमुळेच मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. या सर्वांचे श्रेय निश्चितच या तिन्ही यंत्रणांना जाते.

ठळक मुद्दे१२३ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह : ९ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २६ मार्च रोजी कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला होता. यानंतर जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यात युध्द पातळीवर उपाय योजना राबविल्या. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बारीक नजर ठेवली. नाकाबंदी करुन जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांवर नजर ठेवली.संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षण दिसतात त्यांना रुग्णालयात क्वारंटाईन करुन व त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवून उपचाराला सुरूवात केली. संपूर्ण जिल्ह्यात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. एकंदरीत कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पॉझिटिव्ह प्रयत्न केल्याने गोंदिया जिल्हा कोरोना निगेटिव्ह होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधीत रुग्णांवर १७ दिवस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात आले. सदर रुग्णाने सुध्दा उपचाराला उत्तम प्रतिसाद दिल्याने त्याच्या तिनदा पाठविलेल्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.त्यामुळे तो पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने त्याला तीन दिवसांपूर्वीच रुग्णालयात सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आता एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही. मात्र यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग व पोलीस विभागाने जिल्ह्यात कुठेच शिथिलता येऊ दिली नाही.जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त राहावा यासाठी अजुन काय आवश्यक उपाययोजना करता येईल यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे दिवसभरात तीन चारेवेळा अधिकाऱ्यांकडून आढावा घेत असतात. त्यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा सुध्दा सकाळपासूनच कामाला लागते. यात त्यांना आरोग्य व पोलीस विभागाचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे.पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.यासर्व प्रयत्नांमुळेच मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. या सर्वांचे श्रेय निश्चितच या तिन्ही यंत्रणांना जाते.प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षाजिल्ह्यातील एकूण १३३ नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी १२३ नमुन्यांचा चाचणी अहवाल आज १४ एप्रिलला प्राप्त झाला. त्यामध्ये १२३ नमुने निगेटिव्ह आलेले आहे. तर ९ नमुन्यांचा चाचणी अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.६१ जण शासकीय क्वारंटाईन कक्षातजिल्ह्यात विदेशातून आणि बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर आहे. जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या काही जणांना होम क्वारंटाईन केले जात आहे. तर ६१ जणांना शासकीय कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे.यात गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज ५१ आणि लहीटोला १० अशा एकूण ६१ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या