अज्ञात वाहनाच्या धडकेत जवानाचा मृत्यू; आमगाव-देवरी मार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 18:04 IST2022-02-12T11:13:06+5:302022-02-12T18:04:50+5:30

अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक बसून पोलीस जवान ठार झाल्याची घटना आज सकाळी आमगाव-देवरी मार्गावर अंजोराजवळ घडली.

police constable killed as an unidentified vehicle hits bike on amgaon deori road | अज्ञात वाहनाच्या धडकेत जवानाचा मृत्यू; आमगाव-देवरी मार्गावरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत जवानाचा मृत्यू; आमगाव-देवरी मार्गावरील घटना

ठळक मुद्देभागी गावात शोककळा

गोंदिया : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एक पोलीस जवान जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (दि. १२) सकाळी आमगाव-देवरी मार्गावर अंजोराजवळ घडली. 

विजय फागो उईके (वय ३० रा. भागी, ता. देवरी) असे अपघातात ठार झालेल्या पोलीस जवानाचे नाव आहे. माहितीनुसार, आईआरबी बल १५ बिरसी कॅम्प येथे ड्युटीवर असलेला देवरी (भागी) येथील जवान विजय फागो उईके साप्ताहिक सुटीवर भागी येथे शुक्रवारी गावी आला होता. परिवारासोबत एक दिवस घालवून शनिवारी सकाळी पाच वाजता तो दुचाकीने (एमएच  ०४ जेएन ३१३७) बिरसी येथे जाण्यासाठी घरून निघाला. दरम्यान, देवरी-आमगाव रस्त्यावरील अंजोरा गावाजवळ त्याच्या दुचाकीला सामोरून येणाऱ्या वाहनाने धडक दिली, यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे घटनास्थळी दाखल झाले. असून पुढील तपास सुरू आहे. विजय उईके यांच्या पश्चात आई-पत्नी व दोन मुले आहेत. या घटनेमुळे भागी व देवरी येथे शोककळा पसरली होती.

Web Title: police constable killed as an unidentified vehicle hits bike on amgaon deori road