शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पटेल हे दुसऱ्यांसाठी जगणारे व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 02:09 IST

मनोहरभाई पटेलांनी शिक्षणाची सोय करून देऊन जी सामाजिक भावना ठेवली, त्याच भावनेतून त्यांचे सुपुत्र प्रफुल्ल पटेल हे मार्गक्रमण करीत आहेत.

मान्यवरांच्या भावना : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील १४ गुणवंतांचा सुवर्णपदकांनी सन्मानगोंदिया : मनोहरभाई पटेलांनी शिक्षणाची सोय करून देऊन जी सामाजिक भावना ठेवली, त्याच भावनेतून त्यांचे सुपुत्र प्रफुल्ल पटेल हे मार्गक्रमण करीत आहेत. ते दिल्लीत असले तरी नेहमी गोंदिया-भंडाऱ्याबद्दल बोलत असतात. आज येथे आल्यानंतर त्यांच्या कामांची झलक पहायला मिळाली. आपल्या भागाच्या विकासासाठी त्यांची तळमळ पाहून दंग झालो. पटेल हे दुसऱ्यांसाठी जगणारे व्यक्तिमत्त्व आहे, असे प्रशंसोद्गार इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील प्रसिद्ध पत्रकार, मुलाखतकार रजत शर्मा तसेच माध्यम गुरू म्हणून प्रसिद्ध असणारे सुहेल सेठ यांनी काढले.येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या ११० व्या जयंती समारंभात मंगळवारी (दि.९) ते बोलत होते. प्रसिद्ध सिने अभिनेता आणि युवा दिलांची धडकन सलमान खान याच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रफुल्ल पटेल होते. यावेळी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील १४ विद्यार्थ्यांना मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.यावेळी बोलताना माध्यम गुरू सुहेल सेठ म्हणाले, गोंदिया भारताची शान आहे. शिक्षणाच्या बाबतीत मनोहरभाईंनी जे स्वप्न पाहीले होते त्यामुळे १९८४ मध्येच गोंदियात ‘मेक इन इंडिया’ची सुरूवात त्यांनी केल्याचे दिसून येते. मी गेल्या २०-३० वर्षांपासून प्रफुल्ल पटेलांना ओळखतो. पण आज गोंदियात येऊन त्यांची खरी ओळख झाली, असे ते म्हणाले. रजत शर्मा यांनी बोलताना आज जर मी खा.पटेल यांच्या बोलवण्यावरून गोंदियात आलो नसतो तर मोठी गोष्ट ‘मिस’ केली असती असे सांगून मी गेल्या ३५-४० वर्षात अनेक गोष्टी बदलताना पाहील्या. पण प्रफुल्ल पटेलांना बदलताना पाहीले नाही, असे ते म्हणाले.प्रास्ताविक भाषणात खा.पटेल म्हणाले, नागपूर ते जबलपूरपर्यंतच्या पट्ट्यात कोणतेही कॉलेज नसताना आणि केवळ एक हायस्कूल असताना मनोहरभाईंनी गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना करून गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिक्षणाची दारे उघडली. आज प्रत्येक शाखेच्या अभ्यासक्रमासोबत १ लाख २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याचा मला अभिमान आहे. येथून शिकून गेलेले विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रात सेवा देत आहेत. एके काळी या भागाला केवळ जंगल, आदिवासी प्रदेश आणि नक्षलवाद एवढीच ओळख होती. आज १८ हजार कोटींचा अदानी प्रकल्पांसह सिंचनाच्या सोयी वाढल्या आहेत. त्यामुळे पिकांमध्ये नवनवीन प्रयोग होत आहेत. या जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेऊन विकसित जिल्हा अशी ओळख द्यायची आहे असे खा.पटेल म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन आ.राजेंद्र जैन यांनी केले.यावेळी मंचावर माजी मंत्री अनिल देशमुख, आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.दिलीप बन्सोड, बंडू सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुद्धे, सेवक वाघाये, मधुकर कुकडे, अनिल बावनकर, वर्षाताई पटेल, हरिहरभाई पटेल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)