या पुुलावर कठडे नसल्याने यावरुन ये-जा करताना जीवाला धोका असतो.२० वर्षापूर्वीच तयार केलेल्या या पुुलाचे दोन वेळा लोखंडी कठडे वाहून किंवा काही चोरी गेले.हा पूल सुद्धा अनेक ठिकाणातून जीर्ण झाला आहे. त्यामुळे यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांसाठी हा पूल यमदूत ...
रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात कायम होता.त्यामुळे नदी नाले भरुन वाहत असून सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण २५.८७ मि.मी.पा ...
भीक मागण्यासाठी भटकंती करणारे, आत्मविश्वास गमावून बसलेले, काळानुरूप बदलण्याची मानसिकता नसलेले व परंपरागत व्यवसायाला चिटकून बसलेल्या पेंढारी समाजातील १२ मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कामे गोंदिया तालुक्यातील नवेगाव धापेवाडा येथील शिक ...
आशांना १५ हजार व गटप्रवर्तकांना २५ हजार रूपये मासीक मानधन द्यावे, आशा व गटप्रवर्तकांना महागाई भत्ता द्यावा, वयाच्या ६० वर्षानंतर सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुार आशा व गटप्रवर्तकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी ...
धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजनाची प्रथा असल्याने मंगळवारी (दि.३) सकाळी १० वाजता तहसीलदार मेश्राम यांनी जलपूजन केले. तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा अशी जलदेवतेला मनोकामना केली. ओव्हरफ्लोमुळे पूर संभावित गावातील जनतेने सतर्कता बाळगण्या ...
तालुक्यात इटियाडोह व नवेगावबांध हे दोन मोठे तलाव आहेत. या तलावांच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकट्या नवेगावबांध तलावकाठावर सुमारे २०० एकर शेतजमीन काढली आहे. या जमिनीत धानपीक घेतले जाते. अधिकच्या उत्पादनासाठी धानपीकांवर सातत् ...
प्राथमिक आरोग्य केंद्र पवनीधाबे किंवा ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध यावर आरोग्य सुविधेसाठी झाशीनगरवासी अवलंबून आहेत. आरोग्याच्या अशा आणीबाणीप्रसंगी मोबाईलवरुन रुग्णवाहिका व रुग्णसेविका उपलब्ध करण्यासाठी संपर्क करावा लागतो. परंतु गेल्या महिनाभरापासून मो ...
गोंदियात जमीनीची खरेदी-विक्री करणाºया लोकांनी अब्जावधीची माया जमावून घेतली आहे. काहींनी जमीनी घेऊन ठेवल्या तर काहींनी रोख रक्कम किंवा सोन्याच्या रूपात मालमत्ता जमवून ठेवली. अनेक लोक कर वाचविण्याच्या नादात जमीनीकडे धाव घेतात. परंतु ज्यांचा जमीन खरेदी ...
राज्याचे आद्यदैवत गणरायांचा १० दिवसांचा उत्सव जिल्ह्यासह शहरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जिल्ह्यात सुमारे ९९० सार्वजनिक तर चार हजारांवर खाजगी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. गणरायांच्या या उत्सवासाठी मागील महिनाभरापासून तयारी सुरू होती. गणेश ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी, बोथली व म्हसवानी येथे पावसाने पाणी लोकांच्या घरात शिरल्याने तेथे जनजीवन विस्कळीत झाले. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८२५.३४ मीमी पावसाची नो ...