Maharashtra Election 2019 ; कोण घेणार माघार,कोण राहणार कायम कळणार आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:00 AM2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:18+5:30

गोंदिया, आमगाव, अर्जुनी मोरगाव, तिरोडा या चारही मतदारसंघातून एकूण ७६ उमेदवारांनी १२२ नामाकंन दाखल केले होते. मात्र छाननी दरम्यान काही उमेदवारांनी पक्षाचा एबी फार्म न जोडल्याने तर काहींच्या अर्जात त्रृट्या असल्याने एकूण पाच उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे आता चारही मतदारसंघातून ७१ उमेदवार रिंगणात आहेत.

Maharashtra Election 2019 ; Who will retreat, who will live forever today | Maharashtra Election 2019 ; कोण घेणार माघार,कोण राहणार कायम कळणार आज

Maharashtra Election 2019 ; कोण घेणार माघार,कोण राहणार कायम कळणार आज

Next
ठळक मुद्देउमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस : सर्व मतदार संघातील लढतीचे चित्र होईल स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी २७ आॅक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. शनिवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर चारही मतदारसंघातून आता ७१ उमेदवार रिगंणात आहे. मात्र यात सुध्दा सर्वच पक्षातील बंडखोर उमेदवारांची संख्या अधिक आहे.त्यामुळे त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे. सोमवारी कोण माघार घेणार आणि कोण कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. यानंतरच निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.
गोंदिया, आमगाव, अर्जुनी मोरगाव, तिरोडा या चारही मतदारसंघातून एकूण ७६ उमेदवारांनी १२२ नामाकंन दाखल केले होते. मात्र छाननी दरम्यान काही उमेदवारांनी पक्षाचा एबी फार्म न जोडल्याने तर काहींच्या अर्जात त्रृट्या असल्याने एकूण पाच उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे आता चारही मतदारसंघातून ७१ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यानंतर चिन्हाचे वाटप होऊन निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येणार आहे.
सोमवारी या चारही मतदारसंघातील पक्षातून बंडखोरी करणारे उमेदवार आपले अर्ज मागे घेतात की ते त्यांच्या भूमिकेवर कायम राहतात, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार विनोद अग्रवाल,आमगाव मतदारसंघात माजी आ.रामरतन राऊत, तिरोडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ.दिलीप बन्सोड आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघात काँग्रेसचे राजेश नंदागवळी, आनंद जांभुळकर हे अपक्ष उमेदवार सोमवारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आणि राजकीय पक्षांचे सुध्दा लक्ष लागले आहे.

सर्वाधिक उमेदवार गोंदिया मतदारसंघात
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून एकूण पाच उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर ७१ उमेदवार रिगंणार आहेत. यात सर्वाधिक २५ उमेदवार गोंदिया विधानसभा मतदारसंघात असून त्यापाठोपाठ अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून २०, तिरोडा १६ आणि आमगाव मतदारसंघातून सर्वात कमी १६ उमेदवार रिंगणात आहेत.
प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी फोडला प्रचाराचा नारळ
सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी शनिवारपासूनच प्रचाराचा नारळ फोडत मतदारसंघात सभा बैठका घेण्यास सुरूवात केली आहे.बहुतेक उमेदवार सकाळी ७ वाजतापासूनच मतदारसंघात सक्रीय होत असल्याचे चित्र आहे.गावातील हॉटेल आणि पानठेल्यांना सुध्दा ते आवर्जून भेट देत आहे.
आघाडी युतीचे नेते लागले कामाला
अधिकृत पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली असून त्या पक्षाचे नेते सुध्दा कामाला लागल्याचे चित्र आहे.आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ खा.प्रफुल्ल पटेल, माजी खा.नाना पटोले हे सोमवारी गोंदिया येथे सभा घेणार आहेत.तर युतीचे प्रमुख नेते सुध्दा मतदारसंघात सक्रीय झाले आहेत.
दसऱ्यात होणार स्नेहमिलन
विधानसभा निवडणुकांच्या काळात दसरा आल्याने उमेदवारांना स्रेहमिलन कार्यक्रम घेऊन संवाद साधण्याची नामी संधी चालून आली आहे. त्यामुळे दसऱ्याला सर्वच पक्षाच्या उमेदवारांकडून स्रेहमिलन कार्यक्रम घेण्याचे नियोजन आखले जात आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Who will retreat, who will live forever today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.