शासकीय जागेवर अतिक्रमण करणे हा भारतीय वन अधिनियम १९२७, वनसंवर्धन अधिनियम १९८०, जैवविविधता अधिनियम २००२ चे उल्लंघन आहे. या अधिनियमानुसार शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या अज्ञात आरोपींवर वन गुन्हा दाखल करण्यात आला. झोपडी तयार करण्यास वापरलेले साहित्य, ब ...
जिल्ह्यात सारस आणि परदेशी पाहुण्या पक्ष्यांनी तळ ठोकला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यात पोहोचलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गोंदियात सारस पक्ष्यांसोबत विदेशी पक्षीही वावरत असल ...
इटियाडोह धरण गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान आहे. हे धरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव येथे बांधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती धरणामध्ये गेली. ज्यांची शेती धरणात गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ते सुद्धा सिंचनापासून वंचित होणार आहेत ...
‘ शासन मागण्या मान्य करेना व कर्मचारी मागे हटेना ’ अशा पेचात संप सुरूच आहे. जिल्ह्यातील स्थिती बघितल्यास गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारीही संपावर गेले आहेत. यामुळे दोन्ही आगारातील एकही बस रस्त्यावर उतरलेली नाही. गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारात ए ...
गोंदिया-बल्लारशा मार्गावर सध्या केवळ सकाळी ७.३० वाजताची एकच पॅसेंजर गाडी सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील इतर फेऱ्या आजही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...
गोंदिया जिल्ह्यातील ८ मीटर कायमचे बंद करण्यात आले आहेत. त्यात गोंदियातील एक, आमगाव ४, सालेकसा १, देवरी २ असे ८ मीटर ग्रामपंचायतींचे कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. त्या ८ मीटरचे थकीत वीज बिल दोन लाख ९६ हजार ९७८ रुपये आहे. ग्रामपंचायतींना ५ रुपये य ...
देशात १८ वर्षांपुढे लसीकरणाला सुरूवात झाली असून, त्याखालील मुलांचे लसीकरण अदयाप सुरू झालेले नाही. मात्र, आता ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत केंद्र शासनाने राज्यात ३ जानेवारी २०२२पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना कोविड-१९ लसीकरण सुरू कर ...
जिल्ह्यात सोमवारी २, मंगळवारी १, बुधवारी ५ तर गुरुवारी आणखी ४ बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यातील १२ ॲक्टिव्ह रुग्णसंख्या झाली असून ११ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. तर, गोंदिया तालुक्यातील १ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. ...
तलाठ्याने केलेल्या पंचनाम्यानुसार दसाराम बावनकर यांचे तीन लाख ६५ हजार रुपये, नीलाराम बावनकर यांचे सहा लाख २६ हजार रुपयांचे, दुर्गा बावनकर यांचे तीन लाख १७ हजार व देवचंद बावनकर यांचे ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले. या आगीत घरातील वाॅशिंग मशीन, फ्रीज, ड ...