सालेकसा तालुक्याच्या चिचटोला येथील प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिव चंद्रकला गेंदलाल शिवणकर यांनी गटातून कर्ज घेवून दुग्ध व्यवसायासाठी एक गाय खरेदी केली. ...
दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२७) तालुक्यातील धोबीटोला येथे उघडकीस आली. डेव्हीड खिलेश पुंडे (दोन वर्ष पाच महिने) आणि चहल खिलेश पुंडे (९ महिने) अशी संशयास्पद मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. ...
केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने २०२२ पर्यंत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला आहे. त्याचा मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र एका निराधार महिलेची मागील पाच वर्षांपासून घरकुलासाठी पायपीट सुरू आहे. ...
अनुकंपाधारक उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडून मागील दहा वर्षांपासून दिशाभूल केली जात आहे. आता या उमेदवारांना शासनाकडून नोकर भरतीवर बंद असल्याचे सांगितले जात असल्याने अनुकंपाधारक उमेदवारांची पुन्हा उपेक्षाच होत असल्याचे चित्र आह ...
जिल्ह्याची भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. तर दुसरीकडे दोनशे फुट बोअरवेल खोदकामाची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र ४०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे. ...
भारतीय संविधानामुळे बंधुत्वाचा पाया मजबूत होत आहे. हिंदू, मुस्लीम, सिख, ईसाई सर्व भाऊ-भाऊ आहेत, अशी शिकवण आम्हाला शिक्षकांनी दिली आहे. स्रेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकतेची भावना निर्माण होते. ...
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी आदिवासी गोवारी समाज संघटनेद्वारे विधान भवन नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी करण्यात आलेल्या गोळीबारात १२४ गोवारी समाजबांधव शहीद झाले. ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय हे जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थळ म्हणून ओळखले जाते. या जलाशयाच्या चारही बाजूने हिरवागार शालू परिधान करुन उभ्या असलेल्या पर्वत रांगा आणि त्यामध्ये इटियाडोह जलाशयाची निर्मिती झाली आहे. ...
इमारतींसाठी मौल्यवान समजल्या जाणाऱ्या सागवान वृक्षांची राजोली सहवनक्षेत्रातील जुनेवानी भाग १ च्या कक्ष क्रमांक ३२७ मध्ये अवैध वृक्षतोड झाल्याची बाब उघकीस आली आहे. हा प्रकार महिनाभरापूर्वी घडल्याचे बोलल्या जाते. ...
गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना इंटरनेटच्या सेवेचा लाभ घेता यावा. माहितीचे आदानप्रदान करणे सुलभ व्हावे, नक्षली कारवायांना पायबंद लावण्यास मदत व्हावी, ..... ...