भारतीय संविधानामुळे बंधुत्वाचा पाया मजबूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:27 PM2017-12-26T23:27:42+5:302017-12-26T23:27:55+5:30
भारतीय संविधानामुळे बंधुत्वाचा पाया मजबूत होत आहे. हिंदू, मुस्लीम, सिख, ईसाई सर्व भाऊ-भाऊ आहेत, अशी शिकवण आम्हाला शिक्षकांनी दिली आहे. स्रेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकतेची भावना निर्माण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारतीय संविधानामुळे बंधुत्वाचा पाया मजबूत होत आहे. हिंदू, मुस्लीम, सिख, ईसाई सर्व भाऊ-भाऊ आहेत, अशी शिकवण आम्हाला शिक्षकांनी दिली आहे. स्रेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकतेची भावना निर्माण होते. त्यामुळे बंधुभाव कायम ठेवण्यास मदत होते. याच शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झाले आहे. त्यामुळे या शाळेबाबत मला विशेष प्रेम आहे, असे प्रतिपादन युवा काँग्रेसचे विशाल गोपालदास अग्रवाल यांनी केले.
निर्मल सेमी इंग्रजी स्कूलचे वार्षिक स्रेहसंमेलन नुकतेच पार पडले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने अपूर्व अग्रवाल, निर्मल शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक एन्थोनी डिसुजा, मुख्याध्यापिका सिस्टर मॉग्रेट उपस्थित होते.
या वेळी शिक्षिका शोभा वालदे यांनी शालेय वार्षिक अहवाल सादर केला. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. व्यवस्थापक डिसुजा यांनी मार्गदर्शन केले.
आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन विशाल अग्रवाल यांनी दिले.
संचालन जार्ज जोसेफ यांनी केले. आभार शिक्षिका पूनम शुक्ला यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षिका मंजू बखला, सिस्टर शर्मिला व प्रतिभा, नरेंद्र बन्सोड आदींनी सहकार्य केले.