शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

हाताशी आलेले धान पीक किडींच्या तावडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 06:00 IST

गत महिन्याभरापासून दररोज पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीने धान पीक धोक्यात आले असताना आता धान पिकावर विविध कीडींनी आक्रमण केले आहे. हलक्याप्रतीचा धान लोंब्यावर आला असून उच्चप्रतीचा धान गर्भावस्थेत आहे. अशा परिस्थितीत कीडींनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : कीड नियंत्रणासाठी महागड्या औषधीचा वापर

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : अतिवृष्टी पाठोपाठ किडींनी धान पिकावर आक्रमण केले असून महागड्या कीटकनाशकांचा वापर करूनही कीड नियंत्रणात येत नाही. हाताशी आलेले धान पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. लाखनी तालुक्यात सध्या कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.गत महिन्याभरापासून दररोज पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीने धान पीक धोक्यात आले असताना आता धान पिकावर विविध कीडींनी आक्रमण केले आहे. हलक्याप्रतीचा धान लोंब्यावर आला असून उच्चप्रतीचा धान गर्भावस्थेत आहे. अशा परिस्थितीत कीडींनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतकरी महागडी औषधे फवारून कीड नियंत्रणाचा प्रयत्न करीत आहे. सध्या तुडतुडा, करपा, कडाकरपा याचा अधिक प्रादूर्भाव जाणवत आहे. लाखनी तालुक्यात गराडा परिसरात तुडतुड्याने कहर केला आहे. प्रतिबंधासाठी फवारणीचे डोज दिले जात आहे. पालांदूर परिसरातील पाथरी, मºहेगाव, वाकल, मचारणा, जेवनाळा आदी ठिकाणी धान पीक कीडींच्या कचाट्यात सापडले आहे.पट्टा पद्धतीत कीड नियंत्रण सोपेतुडतुड्याच्या नैसर्गीक नियंत्रणासाठी पट्टा पद्धतीत भात लागवड महत्वाची आहे. खताचा उपयुक्त प्रमाणात मात्रा देवून धान पीकाची निगा राखता येते. बांधात पाणी साठवून ठेवू नये, नियमित पावसाचे पाणी येत असल्याने पाणी खूप ठेवू नये, पिकाचे दररोज निरीक्षण करावे, फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे, अशी माहिती कृषी विभागाच्यावतीने दिली जात आहे.लाखनी तालुक्यात २२ हजार ९०० हेक्टरवर भात लागवड झाली आहे. शेतीशाळांचे आयोजन करून शेतकºयांना कीड नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले जाते. नाहक खर्च टाकून कीड नियंत्रण आवश्यक आहे.-पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनी.

टॅग्स :agricultureशेती