शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

धान पीक रोगराईने नष्ट

By admin | Updated: October 30, 2015 02:00 IST

अगोदर पाण्याने त्यानंतर आता रोगराईने उभ्या धानाला पोखरून काढल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.

मावा व तुळतुळा रोगांचा जोर : तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणीसाखरीटोला : अगोदर पाण्याने त्यानंतर आता रोगराईने उभ्या धानाला पोखरून काढल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. परिसरात त्याही पेक्षा गंभीर स्थिती बघावयास मिळत असून धानपिकावरील रोगराईच्या भस्मासुराने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीची पाहणी जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी जी.जी.तोडसाम यांनी केली. जिल्हा परिषद सदस्य दोनोडे यांनी आपल्या कारूटोला क्षेत्राचा दौरा केला असता शेतकऱ्यांनी आपली कैफियत त्यांच्यापुढे मांडली. यात सलंगटोला येथील शेतकरी रामु अर्जुन चुटे यांनी आर.पी. या जातीच्या धानाची लागवड तीन एकरमध्ये केली होती. यासाठी आतापर्यंत त्यांना जवळपास ३० ते ३५ हजार रुपये खर्च आला.मात्र मावा व तुळतुळा रोगाने त्यांचे तीन एकरातील धान पूर्णपणे फस्त केले आहे. त्यामुळे शेरभर सुद्धा धान त्यांच्या घरी येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. रोगांनी त्यांच्या शेतातले उभे पीक नष्ट केल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती लक्षात घेत त्यांनी तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांनाही सलंगटोला येथे बोलाविले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी पी.एस. मेंढे, कृषी सहाय्यक एच.एम. गजभिये, संजय दोनोडे, माजी सरपंच मिलींद गजभिये, संतोष बोहरे, कुवरलाल बावनथडे, डी.बी. ठाकरे व अन्य उपस्थित होते.यासोबतच अधिकाऱ्यांनी सलंगटोला, दागोटोला व इतर गावांत जाऊन धानाची पाहणी केली. सलंगटोला येथील चंद्रभान मुनेश्वर यांच्या तीन एकरातील व विनोद दोनोडे यांच्या १० एकरातील धानाला मावा व तुळतुळा रोेगाने ग्रस्त केल्याचे यावेळी दिसून आले. हाच प्रकार दागोटोला येथील राजकुमार थेर यांच्या तीन एकरातील तर केशव बावनथडे यांच्या दीड एकर शेतातील धानावर दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. परिसरात अनेक शेतकऱ्यांचे धान रोगराईमुळे नष्ट झाल्याची स्थिती आहे. असे असताना सुद्धा गोंदिया जिल्ह्याला शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केले नाही, ही शोकांतिका आहे. (वार्ताहर)