शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणावर मात करण्यासाठी तंटामुक्त समित्या सरसावल्या

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक अंगणवाडी कुपोषणमुक्त व्हावी, यासाठी राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियानाला नागरिकांचे सहकार्य मिळावे व या मोहिमेसाठी लोक चळवळ उभी राहावी,

गोंदिया : जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक अंगणवाडी कुपोषणमुक्त व्हावी, यासाठी राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियानाला नागरिकांचे सहकार्य मिळावे व या मोहिमेसाठी लोक चळवळ उभी राहावी, म्हणून एकात्मिक बाल विकास, जिल्हा परिषदेतर्फे प्रयत्न करण्यात य्ंोते. परंतु कुपोषण कमी होत नसल्याचे पाहून आता गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती कुपोषणमुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.राज्य शासनातर्फे राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान राबविला जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा तसेच महिला व बाल कल्याण विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत.गोंदिया जिल्ह्यात १ हजार ७०० बालके कमी सौम्य कुपोषित तर २५५ बालके तीव्र कुपोषित आहेत तर १९ हजार बालके ही कमी वजनाची आहेत. कमी वजनात निरंतर काळ बालक राहिल्यास तो बालक कुपोषित होवू शकतो. यामुळे कमी वजनाच्या बालकांची योग्य काळजी घेऊन त्यांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. परंतु कुपोषण कमी होत नसल्याचे चित्र उभे असल्याने जिल्ह्यातील ५५६ गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. जिल्ह्यातील १ हजार ५४७ अंगणवाड्यांमध्ये असलेल्या कमी वजनाच्या बालकांची काळजी कशी घेता येईल यासंबंधी चर्चा करुन आपले गाव कुपोषणमुक्त कसे करता येईल, यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेणार आहेत. ग्राम बालविकास केंद्रात कुपोषित व कमी वजनाच्या बालकांना दाखल करुन त्यांना सामान्य श्रेणीत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कुपोषित बालकांचे वजन वाढविण्यासाठी दिवसातून पाच ते सहा वेळा अतिरिक्त आहार दिला जाणार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या सदस्यांचा कुपोषणमुक्तीसाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. तंटामुक्त गाव मोहिम राबविणारे सदस्य यात महत्त्वाची भूमिका बजावतील. तंटे सोडविण्याबरोबर गावातील सार्वजनिक सण, उत्सव, मेळावे, महापुरूषांच्या जयंत्या शांततेत पार पाडले. गावातील विधवा, परित्यक्ता महिलांचे संरक्षण करणे, हुंडा पध्दतीवर आळा घालण्याचेही लोकोपयोगी कार्य महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने केले. (तालुका प्रतिनिधी)