शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

कोरोनाचा प्रकोप, कलेक्टर ॲक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना हे आठही तालुक्यातील आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणेचा आढावा घेणार आहेत. यासाठी त्यांनी २५ प्रश्न तयार केले असून, या माध्यमातून तालुक्यातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरण याचा आढावा घेत आहेत. तसेच तालुक्यात रुग्ण वाढल्यास स्थानिक पातळीवर काय तयारी आहे, याचासुद्धा ते आढावा घेत आहेत. 

ठळक मुद्देप्रत्येक कोविड सेंटरची पाहणी : ॲक्शन प्लॅनचा घेणार आढावा

 लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढला असून बाधितांचे आकडे दररोज दुप्पट होत आहे तर, ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वेगाने वाढत आहे. मात्र ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्यापही पाहिजे त्याप्रमाणात अलर्ट नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, कोविड केअर सेंटरचा यांना आकस्मिक भेटी देऊन त्यांचा आढावा घेण्यास जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आरोग्य यंत्रणेचा दुर्लक्षितपणा पुढे येत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा वेगाने संसर्ग वाढत आहे. अशात लसीकरणावर भर दिला जात आहे. याला अधिक गती मिळावी यासाठी तालुकास्तरावर काय उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रकोप कमी करण्यासाठी तालुका पातळीवर आरोग्य यंत्रणेने नेमका काय ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. याचा आढावा घेण्यास जिल्हाधिकारी मीना यांनी सुरुवात केली आहे.

२५ प्रश्नातून घेणार आढावा जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना हे आठही तालुक्यातील आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणेचा आढावा घेणार आहेत. यासाठी त्यांनी २५ प्रश्न तयार केले असून, या माध्यमातून तालुक्यातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरण याचा आढावा घेत आहेत. तसेच तालुक्यात रुग्ण वाढल्यास स्थानिक पातळीवर काय तयारी आहे, याचासुद्धा ते आढावा घेत आहेत. जिल्ह्यात पाच कोविड केअर सेंटर जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेता, पुन्हा सहा कोविड केअर सेंटर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. यात अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव आणि गोरेगाव येथील केंद्राचा समावेश आहे. तसेच या केंद्रात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहा विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारीसुद्धा निश्चित करून दिली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी