शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शाळांतील पाण्यात एडीसची उत्पत्ती

By admin | Updated: September 24, 2014 23:38 IST

शहरात गत एक महिन्यापासून डेंग्यूचे थैमान सुरू आहे़ डेंग्यू सदृश्य आजारामुळे चार बालकांचा मृत्यू झाला़ यानंतर खडबडून जागलेल्या प्रशासनाने शहरात मोहीम राबविली़ शिवाय पुण्याची किटक

१०० टक्के डास उत्पत्ती : विद्यार्थ्यांनाच झाली अधिक लागणकिरण उपाध्ये - पुलगावशहरात गत एक महिन्यापासून डेंग्यूचे थैमान सुरू आहे़ डेंग्यू सदृश्य आजारामुळे चार बालकांचा मृत्यू झाला़ यानंतर खडबडून जागलेल्या प्रशासनाने शहरात मोहीम राबविली़ शिवाय पुण्याची किटक तज्ञांची चमूही दाखल झाली़ यात शाळांतील पाण्यामध्येच डेंग्यूच्या ‘एडीस’ची उत्पत्ती होत असल्याचे समोर आले आहे़ यामुळे मुलांना शाळेत पाठवावे की नको, असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे़ वैद्यकीय पथकाद्वारे दोन दिवस शाळा, महाविद्यालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासण्यात आली़ यात शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ मांडल्याचे भयावह चित्र समोर झाले. विशेष म्हणजे चांगल्या व नामांकित शाळांचीही जीवघेणी अवस्था आहे. येथील सर्वच शैक्षणिक संस्थांच्या साठवलेल्या पाण्यात डासांची अंडी (लारवा) व डेंग्यूचे डास आढळून आले़ अस्वच्छ टाकीतील शेवाळयुक्त पाणी नळाद्वारे विद्यार्थ्यांना प्यावे लागत असल्याची विदारक स्थितीही समोर आली़ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहरातील सोमवारी (दि़२२) शाळांत मुख्याध्यापकांची बैठक बोलवून शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता पाळा, स्वच्छता राखा अन्यथा शाळांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद दिली. दहा दिवसांत रुग्णालयात १८०० रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली़ यातील केवळ ३ रुग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळले़ ५५० रुग्णांच्या प्लेटलेट तपासल्या़ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रविवारीही १८५ रुग्णांची खास चाचणी करण्यात आली़ यात १४५ जणांची मलेरिया चाचणी घेतली; पण डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले नसल्याची माहिती आहे़ प्रौढांपेक्षा लहान मुले व नामांकित शाळांतील दहा वर्षे वयोगटाच्या आतील मुलेच अधिक आजारी पडत असल्याने तपासणीचा मोर्चा शाळांकडे वळविण्यात आला़ यात शैक्षणिक संस्थांची स्वच्छतेबद्दल उदासिनता उघड झाली़ आरोग्य विभाग, नगरपरिषद, लॉयन्स क्लब, समाजसेवी संस्था, नगरसेवक, विद्यार्थी शहरात स्वच्छता अभियान राबवित असून जनजागृती करीत आहेत़ शाळांमध्येच डेंग्यूचा अधिक धोका असल्याने पालक मात्र मुलांना शाळेत पाठवित नसल्याचेच दिसते़