शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

रेती माफियांवर ११४ कारवाया

By admin | Updated: February 2, 2016 01:35 IST

शासनाने ज्या रेतीघाटांमधून रेती उपसा करण्यास मंजुरी दिली नाही त्या घाटांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या गौण खनिज माफियांवर आमगाव तहसील कार्यालयाने कारवाया केल्या.

आमगाव तहसीलची कारवाई : १० महिन्यांत ७.६० लाखांचा दंड वसूलगोंदिया : शासनाने ज्या रेतीघाटांमधून रेती उपसा करण्यास मंजुरी दिली नाही त्या घाटांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या गौण खनिज माफियांवर आमगाव तहसील कार्यालयाने कारवाया केल्या. या धाडसत्रात मागील १० महिन्यात आमगाव तहसीलदार व त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी ११४ वाहनांवर कारवाया करून त्यांच्याकडून ७ लाख ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल २०१५ ते २० जानेवारी २०१६ यादरम्यान केलेल्या कारवायांमध्ये गिट्टी, मुरूम, रेती विटा, माती, बजरी, मलबा वाहून नेणाऱ्यांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्याच्या फक्त २० दिवसात ४४ कारवाया करण्यात आल्या असून ३ लाख ५४ हजार ८० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.एप्रिल २०१५ या महिन्यात १७ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून या कारवाईतून ६२ हजार ४०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. मे महिन्यात एक कारवाई करण्यात करून ३२०० रूपये दंड वसूल करण्यात आला. जून महिन्यात दोन कारवाया केल्या. त्यातून २३ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला. जुलै महिन्यात सहा कारवायांमधून ३३ हजार ४०० रूपये दंड वसूल करण्यात आला. आॅगस्ट महिन्यात चार कारवाया झाल्या. त्यात ३२ हजार ७०० रूपये दंड वसूल करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात आठ कारवाया करून ४३ हजार ४६० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. आॅक्टोबर महिन्यात १३ कारवाया करण्यात आल्या. त्यात ८० हजार २०० रूपये दंड वसूल करण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात १० कारवायांमधून ७१ हजार ६२० रूपये वसूल करण्यात आले. डिसेंबर महिन्यात आठ कारवाया झाल्या. त्यात ५५ हजार ८६० रूपये दंड वसूल करण्यात आला. जानेवारी २०१६ च्या २० दिवसांत ४४ कारवाया झाल्या असून त्यातून ३ लाख ५४ हजार ८० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. १० महिन्यात केलेल्या कारवायांमधून ७ लाख ६० हजार ४२० रूपयांचा दंड शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे.(तालुका प्रतिनिधी)रेती माफियांचा अधिकाऱ्यांना त्रासरेती माफियांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची विनाकारण वरिष्ठांकडे तक्रार करण्याचे प्रकार वाढले आहेत. कारवाई करून शासनाच्या महसूल भर घालण्याचे काम तहसीलदार राजीव शक्करवार यांनी केले आहे. यावर्षी पर्यावण विभागाची मंजूरी न मिळाल्याने रेती चोरांचा उपक्रम सुरूच आहे. मात्र त्यांना लगाम घाण्याचे काम शक्करवार व त्यांच्या चमुने केले आहे. मात्र अधिकाऱ्यांची तक्रार काही माफियांनी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. शासनाने मंजुरी न दिल्यामुळे रेती घाटांचा लिलाव झाला नाही. परंतु चोरीच्या मार्माने रेती नेणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. कितीही दबाव आला तरी कारवाई केली जाईल.राजीव शक्करवार तहसीलदार, आमगाव.