शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

जननी सुरक्षेच्या लाभार्थ्यांचे खाते उघडा

By admin | Updated: May 21, 2016 01:45 IST

जननी सुरक्षा योजनेचा आर्थिक लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळाला पाहिजे. यासाठी या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे बँकेत खाते उघडण्यात यावे,

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : आशा कार्यकर्त्यांना वेळेवर मानधन द्या गोंदिया : जननी सुरक्षा योजनेचा आर्थिक लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळाला पाहिजे. यासाठी या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे बँकेत खाते उघडण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १६ मे रोजी जिल्हास्तरीय कार्यप्रणाली समितीच्या सभेत जननी सुरक्षा योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. या वेळी समितीचे सदस्य जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, प्रत्येक लाभार्थ्याचे आधारकार्ड उपलब्ध असले पाहिजे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करता येईल. यापुढे आरोग्यविषयक विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होणार असल्यामुळे बँकेत लाभार्थ्यांचे खाते असणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी लाभार्थ्यांचे खाते शून्य ठेवीवर उघडावीत. शेवटच्या घटकांपर्यंत आशा कार्यकर्त्या प्रामाणकिपणे काम करीत असल्याचे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, आशा कार्यकर्तींचे मानधन त्यांना वेळेवर मिळाले पाहिजे.डॉ. पुलकुंडवार या वेळी म्हणाले, बालकांच्या लसीकरणाचे काम शंभर टक्के झाले पाहिजे. वेगवेगळ्या आरोग्यविषयक सेवा लाभार्थ्यांना व रुणांना वेळेवर देण्याचा प्रयत्न करावा. आरोग्य संस्थांमध्ये असलेल्या जनरेटरर्सचा वापर नियमित केला पाहिजे. याबाबतच्या कुठल्याही तक्र ारी राहणार नाही याची खबरदारी घेण्याचेही त्यांनी सांगितले. सभेला जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, राष्ट्रीयकृत बँकांचे शाखा व्यवस्थापक तसेच विविध आरोग्य संस्थांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी मानले. (प्रतिनिधी)