शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

फक्त दोनच प्लाझ्मा बॅग शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 05:00 IST

कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा जीवदायी ठरत आहे. यामुळेच चांगलेच प्रयत्न करून जिल्ह्यात प्लाझ्मा युनिटला मंजुरी मिळविण्यात आली. ७ डिसेंबर रोजी येथील शासकीय रक्त केंद्रात प्लाझ्मा युनिटचा शुभारंभ झाला व त्यानंतर आतापर्यंत फक्त ५ डोनर्सनीच त्यांचे प्लाझ्मा रक्त केंद्रात डोनेट केले आहेत. त्यानंतर मात्र ५ चा हा आकडा आता प्लाझ्मा युनिटला महिना होत असतानाही काही पुढे जात नसल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात प्लाझ्मा डोनर्सची वानवा : पाचच्या पुढे आकडा वाढेना

 लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शुभारंभ लोटून आता महिना होत असतानाच येथील रक्त केंद्राला प्लाझ्मा डोनर्स काही मिळेना असे दिसून येत आहे. आतापर्यंत फक्त ५ डोनर्सनी प्लाझ्मा डोनेट केला असून त्यांच्यापासून मिळालेल्या १० बॅग्सपॅकी ८ बॅग्स रुग्णांना वितरित करण्यात आल्या आहेत. परिणामी आता फक्त २ बॅग्स रक्त केंद्रात शिल्लक असून अशात गंभीर रुग्णांना प्लाझ्माची गरज पडल्यास मात्र त्यांची मागणी पूर्ण करता येणार नाही अशी स्थिती दिसून येत आहे. यावरून जिल्ह्यात प्लाझ्मा डोनर्सची वानवा दिसून येत असून यामुळे ५ चा आकडा काही पुढे वाढलेला नाही. कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा जीवदायी ठरत आहे. यामुळेच चांगलेच प्रयत्न करून जिल्ह्यात प्लाझ्मा युनिटला मंजुरी मिळविण्यात आली. ७ डिसेंबर रोजी येथील शासकीय रक्त केंद्रात प्लाझ्मा युनिटचा शुभारंभ झाला व त्यानंतर आतापर्यंत फक्त ५ डोनर्सनीच त्यांचे प्लाझ्मा रक्त केंद्रात डोनेट केले आहेत. त्यानंतर मात्र ५ चा हा आकडा आता प्लाझ्मा युनिटला महिना होत असतानाही काही पुढे जात नसल्याचे दिसत आहे. या ५ डोनर्सकडून रक्त केंद्राला १० बॅग्स प्लाझ्मा मिळाला असून त्यातील ८ बॅग्स गंभीर रुग्णांसाठी वितरित करण्यात आल्या आहेत. तर आता रक्त केंद्रात फक्त २ बॅग्स शिल्लक आहेत. विशेष म्हणजे, प्लाझ्मामुळे गंभीर रुग्णाला जीवदान देता येत असल्याचे दिसून आल्याने प्लाझ्माची मागणी वाढत आहे. गोंदियात प्लाझ्मा युनिट नसताना येथील नागरिकांना प्लाझ्मासाठी नागपूरला धाव घ्यावी लागत होती. तेव्हा प्लाझ्मा युनिट गोंदियात सुरू करावे, अशी मागणी केली जात होती. मात्र आता प्लाझ्मा युनिट गोंदियात आले असताना त्यात प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी कोरोनामुक्त रुग्ण पुढाकार घेत नसल्याने प्लाझ्मा युनिटकडून प्लाझ्माची पूर्तता करता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

कोरोनामुक्त रुग्णांच्या पुढाकाराची गरज रक्तदान हेच जीवदान असतानाच कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांसाठी प्लाझ्मा दान हेच जीवदान ठरत आहे. विशेष म्हणजे, प्लाझ्मा डोनेट केल्यानंतर त्याचे शरीरावर काहीच अपाय नसून एखादी व्यक्ती १५ दिवसांनी पुन्हा प्लाझ्मा डोनेट करू शकते. मात्र कोरोनामुक्त झालेल्यांकडून प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याने रक्त केंद्रात फक्त २ बॅग्स शिल्लक आहेत. अशात यापेक्षा जास्त रुग्णांना प्लाझ्माची गरज पडल्यास मात्र कठीण परिस्थिती निर्माण होणार यात शंका नाही. करिता कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या