शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ १५ टक्केच धान कापणी

By admin | Updated: October 30, 2015 01:58 IST

जिल्हा कृषी विभागाच्या नियोजनानुसार १ नोव्हेंबरपासून रबी हंगामाचे कार्य सुरू होणार आहे.

यंदा उत्पन्न घटणार : भारी धानाला एका पाण्याची गरज गोंदिया : जिल्हा कृषी विभागाच्या नियोजनानुसार १ नोव्हेंबरपासून रबी हंगामाचे कार्य सुरू होणार आहे. मात्र आतापर्यंत खरिप हंगामातील केवळ १५ टक्केच हलक्या धानपिकांची कापणी झाल्यामुळे रबीचे कार्य लांबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी गरजेच्या वेळीच पाऊस खोळंबल्याने खरीप धानपिकांच्या रोवण्या लांबल्याने आता कापणीसुद्धा लांबणार अशात रबी हंगामावर परिणाम होणार, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.यावर्षीच्या खरीप हंगामाची स्थिती पाहता सुरूवातीला पाऊस आला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोपवाटिका घातल्या. मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. त्यामुळे काही शेतकरी पावसाची वाट बघत राहिले. पुन्हा पाऊस आल्यावर त्यांनी रोपवाटिकेसाठी धानबियाणे रोवले. मात्र रोपवाटिकेला पाण्याची गरज असताना पाऊस पडला नाही. यानंतर पऱ्हे लावणीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागली. तेव्हाही पाऊस लांबल्याने पऱ्हे उशीरा लागले. आता हलक्या जातीचे धान कापणीवर असताना भारी जातीच्या धानाला एका पाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगतात. हलक्या जातीच्या धानपिकांच्या कापणीनंतर भारी धानपिकांची कापणी होईल. त्यामुळे यंदा रबी हंगामाची कामे लांबणीवर जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यावर्षी खरिपाच्या पिकांना मावा व तुडतुडा रोगाने ग्रासले. मावामुळे जवळपास अर्धे धान नष्ट झाल्याचे शेतकरी सांगतात. तर पावसाने वेळेवर यंदा दगा दिल्याने याचा परिणाम धानपिकांवर झाला. जिल्ह्यात काही ठिकाणी तुडतुडा व कीड रोगामुळे धान पोखरले गेले. या सर्व प्रकारामुळे यंदा धानाचा उतारा खूपच कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याची भरपाई रबी हंगामात करता येईल, अशी आशा त्यांना आहे. कृषी विभागाने रबीच्या पिकांसाठी एकूण ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र नियोजित केले आहे. मात्र पाऊस-पाण्यानुसार रबीच्या क्षेत्रात कमी-अधिक वाढ होत असल्याचे जिल्हा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)रबीची सुरूवात लाखोळी व जवसानेकृषी विभागाच्या नियोजनानुसार १ नोव्हेंबरपासून लाखोळी व जवस या रबी हंगामाच्या पिकांची लागवड सुरू होणार आहे. तर गव्हू व हरभरा पिकाला पाण्याची गरज असल्यामुळे त्यांची लागवड १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. खरिपाच्या धानाची कापणीच अद्याप पूर्ण न झाल्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत शेतकरी रबी पिकांसाठी शेतीच्या कामात गुंतला राहण्याची शक्यता कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.