शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लस न घेण्याचे द्यावे लागेल कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसच घेतली नाही. त्यातील ३७ शिक्षक जिल्हा परिषद अंतर्गत तर उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खासगी शाळांतील आहेत.  या १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमुळे मात्र त्यांच्या संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी त्यांना खुलासा मागितला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्हा परिषद अंतर्गत अजूनपर्यंत १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतला नाही. त्यामुळे ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकही डोस घेतलेला नाही त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या १५२ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी खुलासा मागितला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून कित्येकांना त्यांच्या स्वकीयांपासून हिरावून नेले आहे. अशात आता कोरोनाला मात करण्यासाठी लस उपलब्ध असून या लसींमुळे एकतर बाधित व्यक्तीला गंभीर परिणाम होत नाही. शिवाय त्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तीला लागण होत नसल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. यामुळेच शासन व प्रशासन कोरोना लसीकरणासाठी धडपडत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असल्यामुळेच कोरोना आता नियंत्रणात आला आहे. हीच बाब हेरून आता शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असून ५ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत; मात्र शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असे असतानाही जिल्ह्यातील १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसच घेतली नाही. त्यातील ३७ शिक्षक जिल्हा परिषद अंतर्गत तर उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खासगी शाळांतील आहेत. या १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमुळे मात्र त्यांच्या संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी त्यांना खुलासा मागितला आहे. 

लवकरात लवकर लस घ्या- पाटील- शासनाकडून कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेबाबत बोलले जात आहे. मात्र ही लाट कुणालाही परवडणारी राहणार नसून त्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण हाच एकमेव उपाय हाती आहे. याकरिता ज्या विद्यार्थ्यांच्या पालक व गावकऱ्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही अशांनी १६ ऑक्टोबरपर्यंत पहिला डोस घ्यावा. तसेच यासाठी त्यांना विद्यार्थी, ग्रामपंचायत, युवक मंडळ, बचत गट व शाळा व्यवस्थापन समिती मार्फत प्रोत्साहित करावे असे मुकाअ पाटील यांनी सुचविले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसSchoolशाळा