शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समितीचे गठन झालेच नाही

By admin | Updated: October 15, 2014 23:21 IST

दरवर्षी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड करुन एक तृतीयांश सदस्यांची फेरनिवड करण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र गोेरेगाव तालुक्यातील ग्राम सटवा व डव्वा येथे शासनाच्या

गोंदिया : दरवर्षी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड करुन एक तृतीयांश सदस्यांची फेरनिवड करण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र गोेरेगाव तालुक्यातील ग्राम सटवा व डव्वा येथे शासनाच्या या नियमाला ग्रामसेवक येडे यांच्याकडून तिलांजली देण्यात आली असून सप्टेंबर महिना लोटला तरी अद्याप तंटामुक्त समितीचे गठन करण्यात आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे समितीचे सदस्य व पदाधिकारी संभ्रमात आहेत. गावातील नागरिकांचे तंटे गावात समोपचाराने सोडविण्यात येऊन पोलीस स्टेशन व कोर्टाच्या पायऱ्या चढविण्यापासून नागरिकांना वाचविण्याच्या उदात्त हेतूने राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी तंटामुक्त मोहिम राबविली जात आहे. राज्यात अत्यंत प्रभावी ठरलेली ही मोहिम आता लोकचळवळ झाली आहे. गावातील तंटे, आंतरजातीय विवाह, धार्मिक सण, उत्सव यामध्ये तंटामुक्त मोहिमेची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत असल्याने आजघडीला तंटामुक्त मोहीम प्रत्येक गावात अत्यंत प्रभावीपणे राबविली जाते.निकषाप्रमाणे दरवर्षी या समितीचे गठन करण्यात येत असून दरवर्षी या समितीच्या अध्यक्षाची तसेच समितीतील एक तृतीयांश सदस्यांची निवड करायची असते. त्यानुसार १५ ते ३० आॅगस्ट दरम्यान आयोजित ग्रामसभेमध्ये या समितीचे गठन वा पुनर्गठन केले जाते. मात्र गोेरेगाव तालुक्यातील ग्राम सटवा व डव्वा येथे ग्रामसेवक येडे यांच्या हलगर्जीपणामुळे अजुनही तंटामुक्त समितीचे गठन झालेले नाही.विशेष म्हणजे, दोन्ही गावे तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कृत झाली असली तरी ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे यावर्षी ही गावे नवीन समितीपासून वंचित झाली आहेत. यासंबंधात ग्रामसेवक येडे यांना विचारणा केली असता, आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले. मात्र आचारसंहिता ही १२ सप्टेंबरपासून लागू झाली असून समिती १५ आॅगस्ट ते ३० आॅगस्टदरम्यान का गठीत केली नाही? असा प्रश्न केला असता ग्रामसेवक येडे मात्र निरुत्तर झाले. एकंदरीत ग्रामसेवकाच्या मनमर्जी कारभार व हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट असून ग्रामसेवकावर करवाई करावी, अशी मागणी नागरिकांची आहे. (तालुका प्रतिनिधी)