शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आणखी नऊ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

शहराच्या बापुजी की कुटिया बिअर बारमध्ये एकजण विनाकारण फिरताना आढळले. त्याच्यावर पोलीस शिपाई पृथ्वीराज चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कामधेनू होंडा शोरूमच्यासमोर विनाकारण फिरत असताना आढळल्यामुळे पोलीस शिपाई पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याच्या विरोधात तक्रार केली. गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देसंचारबंदी आदेशाचेही उल्लंघन । खर्रा खाऊन थुंकणाऱ्यांवरही गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून संचारबंदी लागू करण्यात आली.जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. खर्रा, तंबाखू, गुटख्याची दुकाने बंद करण्याचे आदेश लॉकडाऊनपूर्वीच देण्यात आले.परंतु आजही खर्रा विकला जात आहे. भाजीपाला विक्रेते किंवा किराणा दुकानदार लॉकडाऊनचे पालन न करता दुकानात गर्दी करतात. काही लोक खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकतात तर काही विनाकारण रस्त्यावर फिरतात अश्या नऊ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई ३ एप्रिल रोजी करण्यात आली आहे.बालाघाट रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाºया रिंगरोडवरील पुलावर विनाकारण फिरणाऱ्याचौघांवर पोलीस नायक अशोक अंबरवाडे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.शहराच्या बापुजी की कुटिया बिअर बारमध्ये एकजण विनाकारण फिरताना आढळले. त्याच्यावर पोलीस शिपाई पृथ्वीराज चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कामधेनू होंडा शोरूमच्यासमोर विनाकारण फिरत असताना आढळल्यामुळे पोलीस शिपाई पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याच्या विरोधात तक्रार केली. गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया फुलचूरच्या रिलायन्स पेट्रोल पंपजवळ एकाने ३ एप्रिलच्या सायंकाळी ६.४५ वाजता खर्रा खाऊन थुकंल्याने पोलीस शिपाई अशोक अंबरवाडे यांनी त्याला पकडून त्याच्याविरूध्द गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच फुलचूरच्या बसस्थानकाजवळ एकाने ३ एप्रिलच्या सकाळी ७.३५ वाजता दरम्यान एकाने खर्रा खाऊन थुंकल्यामुळे त्याच्यावरही भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.३ एप्रिलच्या सकाळी ७.४० वाजता रिलायन्स पेट्रोलपंपजवळ पुन्हा एकाने खर्रा खाऊन थुंकल्याने त्याच्या विरूध्द गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या