शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शुक्रवारी गोंदिया येथे आढळला होता. यामुळे जिल्हावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण ...

ठळक मुद्देबाधित युवकाच्या कुटुंबीयांचा सुध्दा समावेश । जिल्हावासीयांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शुक्रवारी गोंदिया येथे आढळला होता. यामुळे जिल्हावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभागाने सुध्दा शुक्रवारीच कोरोनाची लागण झालेल्या युवकासह त्याच्या कुटुंबीयांना सुध्दा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्वारेंटाईन केले होते. त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांसह एकूण १४ जणांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविले होते. त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून १२ जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून दोन जणांचा रिपोर्ट रविवारी प्राप्त होणार आहे.देशासह राज्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्रावरील संकटात वाढ होत आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनकडून युध्द स्तरावर प्रयत्न केले जात आहे. कोरोनामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.कोरोनाचे संकट टाळण्यासाठीच सरकारने २१ दिवसांचे लॉक डाऊन केले आहे. मात्र यानंतरही काही जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यातच शुक्रवारी गोंदिया येथील गणेशनगर परिसरातील एका २३ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे प्रयोगशाळेच्या रिपोर्टनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा व शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली होती.यानंतर जिल्हा आणि आरोग्य प्रशासन सुध्दा अ‍ॅक्शन मोडवर आले.आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना बाधीत युवकासह त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांना सुध्दा शुक्रवारी सकाळीच येथील शासकीय महाविद्यालयात क्वारेंटाईन केले. बाधित युवक १७ मार्चला बँकांकहून गोंदिया येथे आला होता. या कालावधीत त्याचा बऱ्याच जणांशी संपर्क आला. त्यामुळे तो नेमका कुणा कुणाच्या संपर्कात आला याची चौकशी आरोग्य विभाग आणि पोलिसांनी शुक्रवारी केली. तसेच त्याच्या सर्वाधिक संपर्कात आलेल्या त्याच्या चार मित्रांना सुध्दा क्वारेंटाईन केले आहे. तर संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना सुध्दा क्वारेंटाईन करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे.बाधीत युवकाच्या कुटुंबातील पाच सदस्यांचे नमुणे शुक्रवारी नागपूर येथील मेयोच्या प्रयोशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे शनिवारी प्राप्त झालेल्या रिपोर्टनंतर स्पष्ट झाले. तर इतर सात जणांचे रिपोर्ट सुध्दा निगेटीव्ह आल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस