शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंताचे नाव थोर पुरुषांच्या यादीत द्या

By admin | Updated: September 22, 2014 23:22 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव भारताला स्वातंत्र मिळवून देणाऱ्या राष्ट्रपुरूषांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या सदस्यांनी केली आहे.

गोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव भारताला स्वातंत्र मिळवून देणाऱ्या राष्ट्रपुरूषांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या सदस्यांनी केली आहे. शासनाच्या नावे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.क्रांतीनायक, मानवतेचे महापुजारी, सहस्त्र पैलू व्यकितमत्वाचे धनी, क्रांतीदर्शी स्वातंत्र्य चळवळीत सिंहाचा वाटा असणारे, विश्वसंत वंदनिय तुकडोजी महाराज हे दिव्य पुरुष होते. भारत मातेच्या रक्षणार्थ १०० दिवस नागपूर व रायपूरच्या तुरुगांत राहीले. ते स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. १९५३ मध्ये जनपानमध्ये विश्वस्तरीय साधू समाज परिषद भरली असताना भारत मातेचे गौरव गीत गावून श्रीराम व श्रीकृष्णाचे देश विश्वाला शोभून राहणारे देश असून ‘प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, विरों का मैदान, इसमें भक्तो के भगवान है’, अशी गर्जना करुन आपला परिचय करुन दिला. त्यावेळी ते १८ राष्ट्राचे अध्यक्ष होते. ही भारत वंशियांसाठी अभिमानाची बाब आहे.अशा सर्वव्यापी, दिव्यपुरुषाचे नाव महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांनी थोर पुरुषांच्या यादीत तुकडोजी महाराजांचे नाव समाविष्ठ करण्यात यावे, याकरिता वर्ष २०१४ मध्ये संपुर्ण महाराष्ट्रात राष्ट्रसंताचे चरण पादुकांची पालखी फिरवून श्री गुरुदेव क्रांती ज्योत यात्रा काढण्यात आली. लाखों भाविकांच्या निदर्शनात ही बाब आणून दिली. मानवतेचे शिखर गाठणारे, ग्रामगीतेचे जनक, विश्वात्मक दृष्टीकोन राखणारे, तेजोमय संताचे तत्वज्ञान विश्वमान्य असे असून ही शासनाचे दुर्लक्ष व्हावे, ही शोकांतिका आहे.राष्ट्रसंताचे नाव थोर पुरुषांच्या यादीत त्वरीत यावे, याकरिता केंद्रीय प्रचार प्रमुख बबनराव बानखेडे, केंद्रीय प्रचार विभाग सचिव दामोदर पाटील, विभागीय प्रसारक भानुदास कराळ, डॉ. राजाराम बोथे, ह.भ.प. गुलाबराय खवसे महाराज, अ.भा. श्री गुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रम जि. अमरावती यांचे पथक राज्यभर फिरले. गोंदिया जिल्ह्यामध्ये क्रांती ज्योत यात्रेकरिता आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्याकरिता आचार्य एम.ए. ठाकूर यांनी प्रयत्न केले. जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले.यावेळी प्रामुख्याने जिल्हा प्रचार प्रमुख भोजराज बघेले, तालुका प्रचार प्रमुख गेंदलाल बघेले, सेवाधिकारी गोरेगावचे ह.भ.प. प्रेमलाल घरत, प्रा. एल.आर. राणे, जिल्हा संघटक देवराव कटरे, शामलाल कटरे, दिनदयाल बघेले, चव्हाण, शामलाल कारंजेकर, शाम मारबदे, अदासी येथील भुमेश्वर ब्राम्हणकर, भोजलाल बिसेन, योगराज येळे, पटले, संतोष चौधरी,व्ही.झेड. बावणकर, परसराम पटले, साजी बोरकर, हिरालाल बिसेन, अशोक हरिणखेडे, दुधराम भांडारकर, प्रकाश रहांगडाले, मेंढे, वाढई, चन्ने, भरत चचाने व जिल्ह्यातील गुरुदेव भाविक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)