शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

विदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली १५२ युवकांना गंडविले

By admin | Updated: October 30, 2015 01:54 IST

दुबई व कुवैतमध्ये नोकरी लावून देण्यासाठी पारपत्र बनवून देण्याच्या नावाखाली सुमारे १५० हून अधिक युवकांना गंडविले.

वडेगाव : दुबई व कुवैतमध्ये नोकरी लावून देण्यासाठी पारपत्र बनवून देण्याच्या नावाखाली सुमारे १५० हून अधिक युवकांना गंडविले. ही घटना गुरूवारी (दि.२९) तिरोडा तालुक्यातील वडेगाव परिसरात उघडकीस आली. या प्रकरणातील ढकबाज आरोपी सुमारे ८० लाख रकमेसह बेपत्ता झाले आहेत. सदर घटनेतील ढकबाज आरोपींमध्ये राजकुमार सुकुल साहनी (३४) रा.भटनी जि. देवरीया (उत्तरप्रदेश) व दुसरा आरोपी अरूण वीरेंद्रकुमार सिंग हे आहेत. यासंदर्भात ढगवल्या गेलेल्या युवकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मागील सुमारे चार महिन्यांपासून वडेगाव परिसरातील कोडेलोहारानंतर तिरोडा व त्यानंतर विर्सी येथील एका हॉटेलमध्ये खोेली करून राहात होते. दुबई व कुवैत या देशात नोकरी लावून देणे व विदेशाकरीता पारपत्र (व्हिसा) बनवून देण्यासाठी या आरोपींनी विविध गावच्या युवकांकडून प्रत्येकी ४०-५० हजार रुपये उकळले. नवख्या युवकांकडून ४५ हजार तर पूर्वी विदेशात जाऊन आले त्यांच्याकडून ४० हजार रुपये व मेडीकलचे चार हजार रुपये असे प्रत्येकाकडून ५० हजार रुपये उकळले. यातून त्याने बोगस पारपत्र, बोगस करारपत्र व बोगस विमान तिकीट तयार केली. एवढेच नव्हे तर मुंबईत सीएसटी येथे ई-ट्रस्ट नावाचे बोगस आॅफीसही दाखविले. निवड केलेल्या बेरोजगार युवकांना २७, २८ व २९ आॅक्टोबर अशा तीन टप्यात विदेशात जाण्यासाठी बोगस विमान व जेट एअरवेज, एअर इंडिया विमानाची बोगस तिकीटे पुरविण्यात आली. युवकांना नियोजित दिवशी मुंबई विमानतळावर पोहचण्यास सांगितले. स्वत: मात्र विमानाने मूळ पासपोर्टसह मुंबईला पोहचणार असल्याचे सांगितले. दि. २७ व २८/१०/१५ रोजी युवक विमानतळावर पोहचल्यावर सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर काहीनी पोलीस स्टेशन ठाणा व काहीनी पोलीस स्टेशन तिरोडा येथे तक्रार दाखल केली आहे. आरोपी विरूध्द तिरोडा पोलिसांनी भादंवि कलम ४२०/३४ अन्वये एफआयआर व १५१ दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार देवीदास ईलमकर यांचे मार्गदर्शनाखाली पीआय देशमुख, इंगळे, कांबळे, बचेरे करीत असून पोलीस चमू तपासासाठी रवाना झालेली आहे. ढगलेल्या युवकांमध्ये माल्ही येथील १९, बोरगाव १२, वडेगाव ९, सातोना १०, बोपेसर ७, भजेपार ७, सर्रा १, कोडेलोहारा ५, सुकडी ६, गुमाधावडा १२, कवलेवाडा ८, बेलाटी खु. ७, डोंगरला २, बिनाकी २, मारेगाव ६, कोयलारी ११ सह इतर गावातील अनेक युवकांचा समावेश आहे. सदर संख्या २०० च्या पुढे असण्याची शक्यता आहे.