शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतच्या तीन पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

By admin | Updated: April 17, 2017 01:00 IST

१३ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेत न आलेल्या विषयांची नियमबाह्यपणे नोंद प्रोसेडिंगमध्ये घेतल्याने

१६ सदस्य आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार देवरी : १३ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेत न आलेल्या विषयांची नियमबाह्यपणे नोंद प्रोसेडिंगमध्ये घेतल्याने नगर पंचायतच्या १६ नगरसेवकांनी ३ पदाधिकाऱ्यांविरूध्द जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी (दि.१२) तक्रार केली. आता जिल्हाधिकारी या तीन पदाधिकाऱ्यांना अपात्र करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सध्या नगरपंचायतचे राजकारण पालटण्याचे चित्र दिसून येत आहे. सविस्तर असे की, नगर पंचायतची सर्वसाधारण सभा ५ एप्रिल रोजी सिरपूर येथील विश्रामगृहात घेण्यात आली होती. या सभेच्या एक दिवसाअगोदर म्हणजे ४ एप्रिल रोजी मागील सर्व साधारण सभेचे १३ फेब्रुवारीचे कार्यवृत्त नगरसेवकांना देण्यात आले होते. वेळेवर मिळालेल्या कार्यवृत्ताचे वाचन केल्यावर नगरसेवकांच्या निदर्शनास आले की सभाध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर कोणतेच विषय आलेले नव्हते. सभेच्या विषय सुचीमध्ये क्र.१ ते १६ पर्यंत विषय होते. फक्त त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले होते. चर्चेत ना आलेल्या विषयांची नियमबाह्य नोंद सभेच्या प्रोसेडींगमध्ये घेवून व नगरसेवकांना अंधारात देवून प्रस्ताव क्रं.१७ ते १९ मंजूर झाल्याचे दर्शविले आहे. ही बाब अत्यंत गंभीर व गैरकायदेशीर असून नियमबाह्य नोंद करणाऱ्या तीन पदाधिकाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र १६ नगरसेवकांनी १२ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. १९ सदस्य संख्या असणाऱ्या देवरी नगर पंचायतच्या १६ नगरसेवकांनी ३ मोठ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाहीची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली असून हे तीन नगरसेवक स्वत:ला वाचविण्याकरीता धडपड करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, नियमबाह्य घेण्यात आलेले ठराव क्रं.१७ ते १९ यामध्ये सूचक अनुमोदक व ठराव पारीत करणाऱ्या अध्यक्षांवर नगर पंचायत अधिनियम ५५ अ अंतर्गत अपात्रतेची कारवाही निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये नगराध्यक्ष सुमन बिसेन, उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके व बांधकाम सभापती आफताब शेख यांचेवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्य नेमीचंद आंबीलकर, रितेश अग्रवाल, दवीदरकौर भाटीया, माया निर्वाण, हेमलता कुंभरे, महेश जैन, सतोष तिवारी, कौसल्या कुंभरे, संजय उईके, कांता भेलावे, भुमिता बागडे, कोकीळा दखने, यादव पंचमवार, प्रवीण दहीकर, अनिल अग्रवाल व सीता रंगारी यांनी लेखी तक्रार केली असून लवकरच या तीन पदाधिकाऱ्यांना नोटीस मिळणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. उल्लेखनीय असे की, १८ महिन्यांचा कार्यकाळ या नगरसेवकांचा झाला असून आता जर या तीन सदस्यांवर अपात्रतेची पाळी आली तर या तिन्ही जागांवर पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)