शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST

मागील चार महिन्यापूर्वी मृतक निलेश याने दारु पिऊन आरोपी पन्नालाल लिल्हारे याच्या सोबत वाद केला होता.त्या वादाचा वचपा म्हणून १० मार्चच्या रात्री ९ वाजता त्याचा खून करण्यात आला. निलेश मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजता सायकलने कावराबांध येथे गेला होता. रात्री ८.३० वाजतापर्यंत घरी न परतल्यामुळे त्याला पाहण्यासाठी बिंझली येथील कन्हार मोहल्यातून त्याचा भाऊ सुनील धनसिंग लिल्हारे (२८) हा मोटारसायकलने पाहण्यासाठी गेला.

ठळक मुद्देबिंझली येथील घटना : तीन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : हैदराबाद येथे मजुरीला गेलेल्या लोकांमध्ये वाद उद्भवल्याने त्या वादाचा वचपा होळीच्या दिवशी काढण्यात आला. तालुक्याच्या बिंझली येथील निलेश धनसिंग लिल्हारे (२४) या तरुणावर १० मार्चच्या रात्री ९ वाजता तिघांनी काठ्यांनी प्राणघातक हल्ला करुन त्याला यमसदनी पाठविले.मागील चार महिन्यापूर्वी मृतक निलेश याने दारु पिऊन आरोपी पन्नालाल लिल्हारे याच्या सोबत वाद केला होता.त्या वादाचा वचपा म्हणून १० मार्चच्या रात्री ९ वाजता त्याचा खून करण्यात आला. निलेश मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजता सायकलने कावराबांध येथे गेला होता. रात्री ८.३० वाजतापर्यंत घरी न परतल्यामुळे त्याला पाहण्यासाठी बिंझली येथील कन्हार मोहल्यातून त्याचा भाऊ सुनील धनसिंग लिल्हारे (२८) हा मोटारसायकलने पाहण्यासाठी गेला. कन्हारटोल्याच्या रस्त्यावरील वळणावर परत येत असताना रात्री ९ वाजले होते. रस्त्यावर एक सायकल पडलेली दिसली. त्या सायकलवर मोटारसायकलचा प्रकाश पडताच त्या सायकलच्या थोड्या पुढे प्रवीण श्रीराम ढेकवार (३८), प्रकाश भरतलाल लिल्हारे (२४) रा. बिंझली हे काठीने निलेशला मारताना दिसले. पन्नालाल भरतलाल लिल्हारे हा लाथाने मारीत होता. जेव्हा सुनीलच्या मोटरसायकलचे लाईट त्यांच्यावर पडले तेव्हा ते तिघेही तिथून पळाले. त्यानंतर ते पडलेल्या व्यक्तीजवळ जाऊन मोबाईलच्या लाईटने पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा भाऊ निलेश होता. निलेश सोबत बोलण्याचा प्रयत्न केला परंतु निलेश बोलू शकत नव्हता. बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या निलेशला पाहून सुनील घाबरुन मोटारसायकलने घरी गेला व काका आणि इतर भावंडांना सागून त्या ठिकाणी आले. परंतु त्याच्या येण्यापूर्वीच निलेशचा मृत्यू झाला होता.या संदर्भात सालेकसा पोलिसात तक्रार करण्यात आली. निलेश हैद्राबादच्या करीमनगर येथे काम करीत असताना पन्नालाल भरतलाल लिल्हारे (२८) याच्यासोबत त्याचा वाद झाला होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी पन्नालालने आतेभाऊ प्रवीण व प्रकाश यांच्या मदतीने कट रचून खून केला. सदर घटनेसंदर्भात प्रवीण श्रीराम ढेकवार, पन्नालाल लिल्हारे व प्रकाश लिल्हारे तिन्ही रा. बिंझली या तिघांविरुद्ध सालेकसा पोलिसांनी भादंवि कलम ३०२, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे.२ मार्चलाच दिली होती धमकीनीलेश हा २ मार्च रोजी आपले भाऊजी रामकिशोर लिल्हारे रा. दरेकसा यांच्यासोबत बिंझलीच्या चौकात गेले असताना त्यावेळी आरोपी पन्नालाल भरतलाल लिल्हारे याने निलेशला ठार करण्याची धमकी दिली होती. या धमकीला गांभीर्याने न घेतल्यामुळे सदर खुनाची घटना घडली.

टॅग्स :Murderखून